Suresh Raina IPL: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पण या आयपीएल हंगामात चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. दरम्यान आता या संघाने आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी नियोजन सुरू केले आहे. त्याचवेळी सुरेश रैनाने (Suresh Raina) संकेत दिले आहेत की ते बॅकरूम स्टाफमध्ये बदल करू शकतात.
रविवारी (25 मे) अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि सीएसके (GT vs CSK) यांच्यातील आयपीएल 2025च्या शेवटच्या लीग सामन्यात बोलताना, रैनाने दावा केला की त्याची माजी फ्रँचायझी पुढील हंगामासाठी नवीन बॅटिंग कोच नियुक्त करू शकते. (Suresh Raina to become CSK batting coach in IPL 2026)
त्यानंतर रैनाचा सहकारी समालोचक आकाश चोप्राने संभाव्य उमेदवाराचे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि विचारले की प्रशिक्षकाचे नाव पहिल्या अक्षर ‘एस’ ने सुरू होते का. येथेच रैनाने “त्याने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे” असे उत्तर देऊन अफवांना खतपाणी घातले. आकाश चोप्रा नंतर म्हणाला, “चलो हो गया भैया, तुम्ही ते आधी इथे ऐकले.”
2014 मध्ये फक्त 16 चेंडूत सीएसकेसाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावावर आहे. (Raina scored the fastest fifty for CSK in 2014)
नंतर, जेव्हा सीएसकेचे सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांना रैनाच्या दाव्याबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, “मला माहित नाही. मला त्यांना विचारावे लागेल की त्यांनी असे म्हटले आहे का.” आता लोक सोशल मीडियावर याबद्दल बोलत आहेत. पण, सीएसकेकडून अद्याप असे कोणतेही अपडेट आलेले नाही. (CSK breaks silence on rumours of Suresh Raina returning to franchise in IPL 2026)
आयपीएल 2025च्या हंगामात, चेन्नई सुपर किंग्ज संघ काही विशेष करू शकला नाही आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. आयपीएलच्या इतिहासात सीएसके हा संघ शेवटच्या स्थानावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.