१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा फलंदाज सुरेश रैना या आयपीएल हंगामातून वैयक्तिक कारणामुळे बाहेर पडला आहे.
सुरेश रैना २००८ पासून प्रत्येक आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळला आहे. त्यामुळे हा पहिलाच असा हंगाम असेल ज्यात तो खेळणार नाही. रैनाने आजपर्यंत आयपीएलमध्ये नेहमीच चांगला खेळ केला आहे.
तसेच त्याच्या नावावर एक खास विक्रमही आहे. आजपर्यंत एकही आयपीएल हंगामात रैनाने ३७० पेक्षा कमी धावा केलेल्या नाही. मात्र या हंगामात तो खेळणार नसल्याने त्याचा हा विक्रम खंडीत होईल.
रैनाने आत्तापर्यंत खेळलेल्या १२ आयपीएल हंगामात तब्बल ६ वेळा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर तीन वेळा ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने तीन वेळाच ४०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचाही खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामन्यात खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.
रैनाला चेन्नई सुपर किंग्सने २००८ मध्ये संघात सामील करून घेतले होते. तेव्हापासून रैना २०१५ पर्यंत चेन्नई संघाकडूनच खेळला. मात्र त्यानंतर २०१६ आणि २०१७ असे दोन वर्ष चेन्नई संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली. त्यामुळे हे दोन वर्ष रैना गुजरात लायन्स संघाकडून खेळला. तसेच त्याने या संघाचे कर्णधारपदही सांभाळले.
२०१८ ला चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना रैनाला लिलावाआधीच संघात कायम केले होते. त्यामुळे २०१८ पासून पुन्हा रैना चेन्नईकडूनच खेळला आहे. पण यावेळी मात्र ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा रैना आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
आयपीएलच्या ११ मोसमातील रैनाची कामगिरी:
४२१ धावा आणि १ विकेट – २००८
४३४ धावा आणि ७ विकेट्स – २००९
५२० धावा आणि ६ विकेट्स- २०१०
४३८ धावा आणि ४ विकेट्स- २०११
४४१ धावा आणि २ विकेट्स- २०१२
५४८ धावा आणि १ विकेट- २०१३
५२३ धावा आणि १ विकेट- २०१४
३७४ धावा आणि २ विकेट्स- २०१५
३९९ धावा आणि विकेट्स नाही – २०१६
४४२ धावा आणि १ विकेट- २०१७
४४५ धावा आणि विकेट्स नाही – २०१८
३८३ धावा आणि विकेट्स नाही २०१९
ट्रेंडिंग लेख –
IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह
मोठी बातमी – सीएसकेचा फलंदाज सुरेश रैना आयपीएल २०२० मधून बाहेर
बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून