दिग्गज खेळाडू सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो अजूनही निवृत्त खेळाडूंच्या काही लीगमध्ये खेळतो. रैना सध्या अमेरिकेत नॅशनल क्रिकेट लीग टी10 मध्ये भाग घेत आहे. या लीगमध्ये तो न्यूयॉर्क लायन्सचा कर्णधार आहे. या लीगमध्ये रैनानं बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनची भरपूर कुटाई केली.
लीगमध्ये न्यूयॉर्क लायन्सचा सामना लॉस एंजेलिस वेब्सशी होता. रैनाच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्कनं हा सामना 19 धावांनी जिंकला. यामध्ये रैनाच्या झंझावाती अर्धशतकानं महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, या लीगमध्ये निवृत्त क्रिकेटपटूंबरोबरच सध्याच्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
या सामन्यात रैनानं 28 चेंडूत 6 चौकार आणि तीन षटकारांसह 53 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं शाकीब अल हसनच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. शाकिब हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्याच्यात एकहाती सामना बदलण्याची ताकद आहे. दुसरीकडे, रैनानं फार पूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. मात्र रैनाची फलंदाजी पाहता तो निवृत्त झाल्यासारखं वाटत नाही. या सामन्यात रैनानं टीम डेव्हिड, टॉड ॲस्ले आणि टायमल मिल्ससारख्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
Suresh Raina makes a roaring entry on the NCL stage with a stroke-filled half-century that lifted New York Lions to 126. 🔥#NCLonFanCode pic.twitter.com/4IS8waiIdF
— FanCode (@FanCode) October 5, 2024
सुरेश रैनाच्या खेळीच्या जोरावर न्यूयॉर्कनं दोन गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. रैनाशिवाय सलामीवीर उपुल थरंगानं 23 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 40 धावांची खेळी केली. लॉस एंजेलिस संघाला अनेक प्रयत्न करूनही विजय मिळवता आला नाही. संघाकडून ॲडम रॉसिंग्टननं सर्वाधिक 31 धावा केल्या. त्यानं 15 चेंडूत एक चौकार आणि चार षटकार ठोकले.
गोलंदाजीनंतर शाकिब फलंदाजीतही अपयशी ठरला. तो 16 चेंडूत केवळ 13 धावा करू शकला. कर्णधार टीम डेव्हिडनं 10 चेंडूत 19 धावांची खेळी खेळली. न्यूयॉर्ककडून शोर्या गौरनं तीन बळी घेतले. तर तबरेझ शम्सीला दोन बळी मिळाले. ओशाने थॉमस आणि डॉमिनिक ड्रेक्सला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा –
भारतात होणार पुढील आशिया कप, परंतु रोहित-विराट खेळणार नाहीत! कारण जाणून घ्या
आयपीएल 2025 पूर्वी हार्दिक पांड्याला धक्का! मुंबईच्या कर्णधारपदासाठी हा खेळाडूने केली ईच्छा व्यक्त
पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पिच रिपोर्ट आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या