आयपीएल २०२१ च्या संपूर्ण हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा फलंदाज सुरेश रैना काही खास कमाल करू शकलेला नाही. आयपीएलचा हा हंगाम रैनासाठी एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे ठरला आहे. शनिवारी (०२ ऑक्टोबर) हंगामातील ४७ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सममध्ये खेळला गेला. रैना या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. तो केवळ ३ धावा करून बाद झाला. त्याला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. अशात चाहते रैनाच्या जागी रॉबिन उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याची मगणी करत आहेत.
रैनाने या सामन्यात एकूण ५ चेंडूंचा सामना केला आणि ३ धावा करून तंबूत परतला. राहुल तेवतियाच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात रैना अडकला. रैनाने तेवतियाच्या एका चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने षटकारासाठी एक मोठा शॉट खेळला. पण चेंडू सीमारेषेपार जाऊ शकला नाही आणि शिवम दुबेने त्याचा झेल घेतला.
संपूर्ण हंगामातील रैनाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने १२ सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने आणि १३० च्या स्ट्राइक रेटने अवघ्या १६० धावा केल्या आहेत. अशात सोशल मीडियावर रैनाला ट्रोल केले जाऊ लागले आहे.
#AskTheExpert why Robin Utthapa has been confined to CSK bench. How come Suresh raina gets an advantage!? #CSKvsKKR
— Raju Suvarna (@RajuSuvarna007) October 2, 2021
हंगामातील त्याच्या प्रदर्शनामुळे आणि राजस्थानविरुद्ध चेन्नईचा पराभव झाल्यानंतर चाहते रैनावर चांगलेच भडकलेले दिसत आहेत. चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत असून काहींनी त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. सीएसकेसाठी यावर्षी रॉबिन उथप्पाच्या रुपात एक अनुभवी खेळाडू बेंचवर बसलेला आहे. चाहत्यांची इच्छा आहे की, रॉबिन उथप्पाला सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली पाहिजे.
Y dnt u rest raina and give opportunity to uthappa, May I knw what is the role of raina, clearly he is out of shape…
— Prasanth elumalai (@prasanth9063) October 2, 2021
Next match la uthappa & Jaggi ah erakunga ya yov. @ChennaiIPL#CSK #WhistlePodu
— Vignesh (@Urstruelyvicky) October 2, 2021
दरम्यान, सामन्यात राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. असे असले तरी, चेन्नईने या सामन्यात राजस्थानला चांगले आव्हान दिले होते. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने ६० चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली होती. चेन्नईने राजस्थानपुढे ४ विकेट्स गमावून १९० लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थानने अवघ्या १७.३ षटकात हे आव्हान गाठले. राजस्तानच्या यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी महत्वाची अर्धशतकी खेळी केली. तसेच राजस्थानच्या राहुल तेवतियाने सामन्यात ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारुनही ‘इतक्यांदा’ सीएसकेच्या नशीबी आलाय पराभव
पहिल्या डावात पंगा घेणाऱ्या कृणालला अश्विनचे बॅटीने उत्तर, ‘धोनी स्टाईल’ षटकारासह जिंकवला सामना
‘बचना ए हसीनों, दुबे आ गया’, सीएसकेला धू धू धुणाऱ्या शिवमला चाहत्यांचे हटके चीयर; व्हिडिओची चर्चा