दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू सुरेश रैना पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. रैनाने माजी कर्णधार एमएस धोनी सोबतच १५ ऑगस्ट रोजी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. कौटुंबिक कारणांमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती. तेव्हापासूनच क्रिकेट रसिक रैनाच्या मैदानातील पुनरागमनाची वाट बघत होते. रैनाने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी माघार घेतली असली, तरी तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
येत्या शनिवारी (१२ डिसेंबर) तो कानपूर येथे येणार आहे व तेथे उत्तर प्रदेश संघाच्या सराव शिबिरात सहभागी होणार आहे. तेथेच तो १३ व १५ डिसेंबर रोजी सराव सामना देखील खेळणार आहे.
रैनाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी सध्या उत्तर प्रदेश संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणार आहे. उत्तर प्रदेशला आणखी एक स्पर्धा जिंकून देण्याचं माझं स्वप्नं आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर माझे पूर्ण लक्ष आगामी आयपीएलस्पर्धेकडे असेल.”
रैनाने आपला शेवटचा प्रथमश्रेणी सामना मागील वर्षी १४- १७ डिसेंबर दरम्यान झारखंडविरुद्ध खेळला होता. तसेच शेवटचा आयपीएल सामना १२ मे २०१९ रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला होता. हा सामना आयपीएल २०१९ चा अंतिम सामना होता. रैना सध्या जम्मू- काश्मीरमध्ये क्रिकेट प्रशिक्षण संस्था उभारण्याच्या कामात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याने जम्मू- काश्मीरला जावून लहान मुलांना प्रशिक्षणदेखील दिले होते.
क्रिकेट वर्तुळात सध्या चर्चा आहे की, रैना केवळ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच खेळणार आहे, रणजी ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे.
रैनाने आतापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात कसोटीत त्याने २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. सोबतच टी२०त त्याने २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यातून विराट होऊ शकतो बाहेर, स्वत:च दिले संकेत
‘चार महिन्यांपासून मुलाचं तोंड नाही पाहिलं’, सामनावीर पुरस्कार पटकावणारा पंड्या भावूक
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू