---Advertisement---

“विराट कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित…” ‘या’ माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया

On: शनिवार, मे 17, 2025 11:28 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने अलिकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (Virat Kohli Retires From Test Cricket) विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिलं आहे. तसेच या काळात त्याने अनेक ऐतिहासिक रेकाॅर्ड्स देखील आपल्या नावावर केले आहेत. विराटने वयाच्या 36व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तत्पूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने विराट कोहलीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Suresh Raina Statement On Virat Kohli)

आयपीएल 2025च्या उर्वरित सामन्यांना आजपासून (17 मे) सुरूवात झाली. दरम्यान या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) संघ बंगळुरूच्या मैदानावर भिडणार होते. परंतु पावसामुळे हा सामना वाया गेला. केकेआरच्या दृष्टीने हा सामना खूप महत्वाचा होता. पण आता केकेआरचा संघ प्लेऑफच्या बाहेर पडला आहे.

दुसरीकडे आरसीबीचा संघ आता 17 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पण निराशाजनक गोष्ट म्हणजे विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे त्याला मानवंदना देण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून आले होते. पण पावसामुळे त्यांना किंग कोहलीचा जलवा पाहायला मिळाला नाही.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल विराट कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---