इंडियन प्रीमिअर लीग (IPL) भारतातलीच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमधील एक आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम आता 2023मध्ये खेळला जाणार आहे. या हंगामाची जय्यत तयारी बीसीसीआयने सुरु केली आहे. भारताच्या या लीगमध्ये देशी- विदेशी खेळाडू खोऱ्याने पैसे ओढतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडू या लीगची आतुरतेने वाट पोहतो. या हंगामासाठी मिनी ऑक्शन 23 डिसेंबरला कोचिन येथे संपन्न होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना हा या लिलावात विशेष भुमिकेत पाहायला मिळणार आहे. याची घोषणा त्याने आधीच केलेली होती.
भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने आयपीएलबरोबरच देशांतर्गत क्रिकेटमधून देखील निवृत्ती घोषीत केली होती. यामुळे तो आयपीेलमध्ये पुन्हा खेळाडूच्या भुमिकेत दिसणार नाही. रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे जुने नाते आहेे. रैनाची त्या संघाशी नाळ जोडली गेली आहे. परंतु, या हंगामात तो एका खेळाडूऐवजी समालोचकाच्या भुमिकेत दिसणार आहे. रैना बरोबरच ख्रिस गेल (Chris gayle), अनिल कुंबळे (Anil Kumble), रॉबिन उथप्पा (Robin Uthappa), आरपी सिंग (RP Singh), ईयान मॉर्गन (Eoin Morgan), एबी डीविलियर्स (AB De Villiers) यांसारख्या माजी खेळाडूंना प्रेक्षक समालोचकाच्या भुमिकेत बघतील.
या सर्व माजी खेळाडूंना लिलावाच्या वेळी फ्रेंचायझीद्वारे खरेदी केेलेल्या खेळाडूंच्या निवडीवर त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी वायकॉम 18 माध्यम संस्थेने विशेषरज्ञ पॅनल म्हणून चॅनलशी जोडलेे आहेे. या लिलावाच्या आधी रैनाने एक फोटोशूट केला, ज्याचे फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट विरुन शेअर केले. हे फोटो शेअर करताना रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शूटमोड, आयपीएलच्या लिलावाची तयारी.”
https://www.instagram.com/p/CmY0RY7PBaJ/?utm_source=ig_web_copy_link
रैना आणि आरपी सिंग हिंदीत करतील समालोचन-
हे सर्व माजी खेळाडू लिलावाच्या एक दिवस आधी ‘इन-मॉक हाऊस ऑक्शन’ नावाच्या शोमध्ये देखील दिसतील. रैना आणि आरपी सिंग मुख्य लिलावाच्या दिवशी हिंदी समालोचनाने लिलावाची प्रत्येक बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील. या लिलावात कोणत्या खेळाडूवर पैशांचा पाऊस होणार हे पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्साहित आहे. (Suresh Raina shared his photos before IPL mini auction and he will be in role of hindi commentator)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गाबा पिचला इंग्लंडच्या दिग्गजाचे समर्थन! भारताच्या खेळाडूने एक ट्वीट करत केली बोलती बंद
‘तो आमचा कर्णधार आहे आणि राहणारच’, बाबर आझमच्या समर्थनास पाकिस्तानी खेळाडूचे संतप्त ट्वीट