---Advertisement---

सुरेश रैनाला सीएसकेकडून अपेक्षा! आयपीएल २०२३पूर्वी मैदानावर करतोय कसून सराव

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 9:19 AM
Suresh-Raina-Practice
---Advertisement---

टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही तो क्रिकेटच्या मैदानावर सराव करताना दिसतो. त्याला गेल्या वर्षी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (CSK)ने सोडले होते, त्यानंतर त्याला लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. त्यामुळे तो आयपीएलचा (आयपीएल २०२२) हंगाम खेळू शकला नाही. मात्र, तरीही त्याला यंदाही काही संघ संधी देईल, या आशेने तो मैदानावर सराव करताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

https://www.instagram.com/reel/ChpVRE_lFkm/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/reel/ChmV7I_FKPC/?utm_source=ig_web_copy_link

सध्या व्हायरल होत असलेल्या त्याच्या व्हिडिओमध्ये तो सराव करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो आधी बॅटिंग पॅड घातलेला आणि नंतर तो जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पहिले प्रेम! मैदानावर परतलो.”

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीने दाखवले ‘विराट’ मनं! दुबईत पोहोचताच घेतली कट्टर प्रतिस्पर्धी बाबर आझमची भेट

Asia Cup: युएईला लोळवत हॉंगकॉंगचा मुख्य स्पर्धेत दिमाखात प्रवेश; भारत-पाकिस्तानला देणार टक्कर
“मी ३५ चा आहे ७५ चा नव्हे”; इंडिया ए संघातही निवड न झाल्याने उद्विग्न झाला जॅक्सन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---