भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि प्रियंकाने पाच वर्षांपुर्वी लग्न केले. प्रियंकाला लग्नासाठी मनविण्यासाठी रैनाने 45 तासांचा विमानप्रवास केला होता. याचा खुलासा खुद्द रैनानेच नुकत्याच झालेल्या ‘कपिल शर्मा शो’ मध्ये केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा बिघडलेला खेळ आणि सुरेश रैनाचे संघात नसणे या दोन्ही गोष्टी त्यांच्या चाहत्यांसाठी निराशाजनक आहेत. पण एक गोष्ट अशी जी रैनाने सांगितली जी ऐकून तुम्हाला कदाचित हसू येईल आणि तुमच्याही भुवया उंचावतील. तुम्हीही म्हणाला ‘वाह काय प्रेम आहे भाऊच?’ सुरेश रैनाची पत्नी प्रियंका ही एका क्रिकेट प्रशिक्षकाची मुलगी आहे. त्यामुळे रैना व प्रियंका दोघेही लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. या सर्व गोष्टी नुकत्याच झालेल्या ‘कपिल शर्मा शो’ मध्ये रैना दांपत्याने शेअर केल्या.
लग्ना अगोदर सुरेश रैनाने प्रियंकाच्या वडीलांकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या वडिलांनी त्यांचा होकार कळवला परंतु प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी हा निर्णय घेणार नसल्याचे प्रियंकाने स्पष्ट केले. त्यावेळी रैना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तर प्रियंका ब्रिटनमध्ये होती. तिला भेटण्यासाठी रैनाने 45 तासांचा विमानप्रवास केला. यावेळी रैनाने ऑस्ट्रेलिया ते दुबई व नंतर तिथून ब्रिटन असा प्रवास केला होता. रैनाने भेटीसाठी केलेली इतकी धडपड प्रियंकाला भावली आणि तिने या भेटीतच लग्नासाठीचा होकार कळवला.
रैनाने केलेला 45 तासांचा विमानप्रवास हा जीवनातील सर्वात सुंदर विमानप्रवास असल्याचे त्याने सांगितले होते. जाताना भेटीची ओढ आणि येताना होकाराचा आनंद असल्याने हा प्रवास खूप सुंदर वाटल्याची भावना रैनाने व्यक्त केली. पुढे 3 एप्रिल 2015 ला प्रियंका चौधरी प्रियंका रैना बनली आणि दोघांचा संसार सुरू झाला. आज त्या दोघांना दोन गोंडस चिमुरडे असून ते एक सुखी कुटुंब आहे.