भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना लीग क्रिकेटमधून मैदानात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. आगामी लंगा प्रीमियर लीगमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा रैनाची फटकेबाजी पाहायला मिळू शकते. आगामी लंका प्रीमियर लीग 30 जूलै रोजी सुरू होणार असून त्याआधी 14 जूनला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे.
सुरेश रैना (Suresh Raina) भारतीय क्रिकेट संघाच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीग (Lanka Premier League 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व अनेक वर्ष केले. सीएसकेला सुरुवातीच्या चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात रैनाचा वाटा महत्वाचा राहिला आहे. यावर्षी फ्रँचायझीने पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण रैना मात्र यावेळी संघाचा भाग नव्हता. आयपीएलमध्ये संधी मिळाली नसली, तरी रैनाने इतक्यात हार मानली नाहीये. आगामी लंगा प्रीमियर लीगसाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात त्याने आपले नाव नोंदवले आहे. 50000 यूएस डॉलर्स ही त्याची बेस प्राईस असेल.
तत्पूर्वी 36 वर्षी सुरेश रैनाने सप्टेंबर 2022मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. त्यानंतर डिसेंबर 2022मध्ये रैना अबू धाबी टी-10 लीगमध्ये केळला. या लीगमध्ये त्याने डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना 3 सामन्यात 36 धावा केल्या. त्याने यावर्षी मार्च महिन्यात लिजेंट्स लीक क्रिकेटमध्येही भाग घेतला होता. सोबतच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023मध्ये तो समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसला होता. आयपीएलमध्ये रैनाची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याने या लीगमध्ये एकूण 205 सामने खेळले आहेत. यात 32.51ची सरासरी आणि 136.76च्या स्ट्राईक रेटने 5528 धावा केल्या आहेत. यात 39 अर्धशतक आणि एका शतकाचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागतो.
500 पेक्षा अधिक खेळाडू घेणार एलपीएलच्या लिलावात सहभाग
दरम्यान, आयपीएलप्रमाणेच लंका प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या पाच फ्रँचायझींना प्रत्येकी 500000 यूएस डॉलर्स रुपये खेळाडूंवर खर्च करण्याची परवानगी असेल. लिलावात 500 पेक्षा जास्त खेळाडू असणार आहेत, ज्यापैकी 140 खेळाडू विदेशी अशतील. (Suresh Raina to participate in LPL 2023 auction)
महत्वाच्या बातम्या –
नवरा बायकोकडे आहेत आयसीसीच्या 11 ट्रॉफी, पाहा मिचेल स्टार्क- एलिसा हेलीचा पराक्रम
“पैसा येतो जातो पण देश…” WTC विजयानंतर स्टार्कने सगळंच सांगितलं