---Advertisement---

“कदाचित धोनी विसरला वाटतं”, रैना अनसोल्ड झाल्यानंतर चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 11:19 AM
ms-dhoni,suresh-raina
---Advertisement---

मिस्टर आयपीएल (IPL) नावाने प्रसिद्ध असलेला विस्फोटक भारतीय फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina)  आगामी हंगामात खेळताना दिसून येणार नाहीये. आयपीएलच्या लिलावात कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावण्यात रस दाखवला नव्हता. गेली अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings)  संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिलीज केले होते. तसेच २ कोटी मूळ किंमत असलेल्या सुरेश रैनाला संघात स्थान देण्यासाठी १० पैकी एकाही संघाने पुढाकार घेतला नाही. दरम्यान सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

आयपीएल लिलावात निवड न झाल्याने अनेकांना असे वाटू लागले आहे की, सुरेश रैनाची कारकीर्द संपुष्टात आली आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यानंतर देखील फ्रँचायजी सुरेश रैनाला आपल्या संघात स्थान देऊ शकतात. असे वाटत होते की, लिलाव प्रक्रियेत सुरेश रैनाचे नाव येताच चेन्नई सुपर किंग्ज संघ बोली लावणार, परंतु असे काहीच झाले नाही. सुरेश रैनाची निवड न झाल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चाहते भलतेच निराश झाले आहेत.

एका युजरने ट्विट करत लिहिले की, “सुरेश रैना एकदा म्हणाला होता की, ‘ जर सीएसकेने आयपीएल २०२१ स्पर्धेत विजय मिळवला तर मी धोनीला सांगेल की, तू २०२२ स्पर्धेत पण खेळ..’ आता धोनी असेल पण आयपीएल २०२२ स्पर्धेत रैना नसेल..’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कदाचित धोनी रैनाला विसरला आहे पण, तुम्ही त्याला विसरू नका..” तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “जर धोनीमध्ये थोडी ही लाज शिल्लक असेल तर त्याने निवृत्ती जाहीर करावी.. रैनाने धोनीसाठी आपली कारकिर्द संपवली. परंतु सीएसकेने रैनासाठी २ कोटी देखील खर्च केले नाही…”

https://twitter.com/itz_satheesh/status/1492875728039256065?t=UX4f9FfhtFQePWPBYbTfGw&s=19

https://twitter.com/SaiKingkohli/status/1492888302009008128?t=sZMUwYv_RVr1EUGmm3QVGw&s=19

सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनी एकत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. दोघांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी हा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या :

मुंबईने घडविलेल्या ‘या’ गोलंदाजाला केकेआरने केले आपल्या ताफ्यात सामील

अगग! बोल्टच्या रिप्लेसमेंटसाठी मुंबईने खर्च केले ८ कोटी, पण वेगवान गोलंदाज पूर्ण हंगाम असेल अनुपलब्ध?

एमएस धोनीला मिळाला ‘सेनापती’, मेगा लिलावात लाखो खर्च करत ओडिसाच्या खेळाडूची केली निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---