इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील २९ सामने यशस्वीरित्या पार पडल्यानंतर संघांच्या बोयबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु, येत्या सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होणार आहे. हा उर्वरित हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज सुरेश रैनाने एमएस धोनीबद्दल मन जिंकणारे वक्तव्य केले आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने चांगली सुरुवात केली होती. स्पर्धा स्थगित झाली, तेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. संघाचा कर्णधार एमएस धोनी फॉर्ममध्ये नसताना देखील चेन्नई संघाने अप्रतिम कामगिरी केली होती.
अशातच स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात सुरेश रैना याने म्हटले की, “आम्ही दोघांनी भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्स संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. मला वाटते की, ही फक्त एक भावना आहे. त्याउलट आम्हाला एकमेकांचा आदर आहे. मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे. आम्ही एकत्र अनेक ट्रॉफी जिंकल्या जात आहेत. पण मला वाटते की, आमच्यात एकमेकांबद्दल असलेला आदर खूप मोठा आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला अशी आशा आहे की, जेव्हा आम्ही यूएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी जाऊ, तेव्हा धोनीसाठी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. यावर्षी आम्ही ज्याप्रकारे खेळलो आहोत, त्यामुळे अधिक आत्मविश्वास मिळाला आहे. आम्ही मिळवलेल्या यशाचा एकत्र आनंद साजरा करत असतो. धोनी सर्व खेळाडूंना मुख्यतः मोइन अली, सॅम करन, ब्रावो, ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांना मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य देत असतो.”
धोनी आणि रैनाने गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्यांनी आयपीएलमध्ये खेळणे सुरु ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“विजय मिळवणेच श्रीलंका संघ विसरुन गेला आहे”, दिग्गज क्रिकेटरकडून आपल्याच देशाच्या संघाला घरचा आहेर
रोहित शर्मा पहिल्यांदाच बनणार कसोटी कर्णधार? ‘हे’ आहे कारण