मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा १३वा सामना गुरुवारी (१ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली. यादरम्यान रोहित फलंदाजी करत असताना पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला होता. शमीच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने शानदार चौकार ठोकला. या चौकारासह रोहितने आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार केला. असा कारनामा करणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
रोहितने या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने रोहितचे कौतुक केले आहे. रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्वीट करत लिहिले की, “आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन रोहित. मला तुझा अभिमान आहे.”
Heartiest congratulations my brother on achieving another great milestone of completing 5k runs @ImRo45. Proud of you, more power to you!✊#MIvsKXIP
— Suresh Raina???????? (@ImRaina) October 1, 2020
विशेष म्हणजे रोहित आधी हा विक्रम भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच रैनाने केला आहे.






