भारतीय कर्णधार विराट कोहली काऊंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळणार होता. पण आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीने पुन्हा जोर धरल्याने विराटला काऊंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली होती. विराट सरेकडून ३ एकदिवसीय आणि ३ चारदिवसीय लढती खेळणार होता.
विराटचा बदली खेळाडु म्हणून दक्षिण अफ्रिकेचा २५ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज थेनीस डि ब्रुइनला करारबद्ध करण्यात आले आहे. ब्रुइनने दक्षिण अफ्रिकेकडून ५ कसोटी आणि २ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
सरे वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ब्रुइन म्हणाला, “मी खुप उत्सुक आहे काऊंटी क्रिकेट खेळायची माझी अगोदरपासूनच महत्त्वाकांक्षा आहे.”
“जेसन रॉय व टॉम कर्रन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय संघात गेल्याने तसेच बेन फोक्स, सॅम कर्रन इंग्लंड लॉयन्सचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यामुळे पुढील दोन काऊंटी चॅम्पियनशिप लढतीत़ ब्रुइनवर महत्त्वाची जबाबदारी असेल.” असे सरेचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट अॅलेक स्टुअर्ट म्हणाले .
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर






