भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 1 चेंडू राखून 5 विकेट्स शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे काही खेळाडू रडीचा डाव खेळत मुद्दाम भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव याला डिवचताना दिसले.
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि गोलंदाज शादाब खान (Shadab Khan) हे भारताचा ‘नवा 360 डिग्री’ फलंदाज सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) स्लेजिंग करताना दिसले.
त्याचे झाले असे की, कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र रोहित सहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर संघाच्या 54 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ 6.1 षटकात राहुलनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर मधल्या फळीत विराट कोहलीसह सूर्यकुमारवर मोठ्या धावा करण्याची जबाबदारी होती.
सूर्यकुमार फलंदाजीसाठी मैदानावर आल्यानंतर त्याने पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खान याच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारला. त्यानंतर पुढील दोन चेंडू निर्धाव राहिले. यादरम्यान गोलंदाज शादाब आणि यष्टीमागे उभा असलेला रिझवान दोघे मिळून सूर्यकुमारला स्लेजिंग करताना दिसले. शादाबच्या एका चेंडूवर सूर्यकुमार बाद होता होता राहिला. यानंतर मुद्दाम शादाब सूर्यकुमारजवळ जात त्याला काहीतरी बोलताना दिसला.
लगेचच मागून रिझवानही सूर्यकुमारजवळ आला आणि त्याला डिवचू (Pakistan Cricketers Sledging Suryakumar Yadav) गला. परंतु सूर्यकुमारने त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. हा प्रसंग पाहून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम गालातल्या गालात हसतानाही कॅमेरात कैद झाला. सूर्यकुमार 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून बाद झाला.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1566437777797181441?s=20&t=WjbRrmJQ2H58U2Oz_IDuxw
पाकिस्तानने हिशोब केला बरोबर
आशिया चषकातील दुसराच साखळी फेरी सामना भारत आणि पाकिस्तान संघात झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. यानंतर आता सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत करत पराभवाचा वचपा काढला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’
पराभवानंतर नेटकऱ्यांनी घेतला अर्शदीपचा समाचार, गलिच्छ भाषेत केली टीका
टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ‘जोडी नंबर वन’ बनले रोहित-राहुल