बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ ऑक्टोबरला भारतीय संघांची घोषणा केली. या दौऱ्यासाठी मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड होईल असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सध्या भारतीय निवड समीतीवर जोरदार टिका होत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही निवड समीतीवर निशाणा साधला आहे. यात माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचाही समावेश आहे.
आकाश चोप्राने ट्विट केले आहे की ‘सुर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाच्या फ्लाईटमध्ये असायला हवा. टी२० मालिकेसाठी तरी.’ हे ट्विट करत चोप्राने अप्रत्यक्षरित्या निवड समीतीवर सुर्यकुमारला भारतीय संघात संधी न दिल्याबद्दल टिका केली आहे.
Surya Kumar Yadav should’ve been on the flight to Australia. For the T20i series. #MI
— Aakash Chopra (@cricketaakash) October 28, 2020
सुर्यकुमारने मागील ३ आयपीएल हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१८पासून आयपीएलमध्ये ४८ सामन्यात १२९८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९ अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी झाली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020:… म्हणून हार्दिक पंड्या आणि ख्रिस मॉरिसला मॅच रेफ्रीने दिला इशारा, पाहा व्हिडीओ
“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले
बंदे मै दम हैं! सुर्यकुमारला मिळाली विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप