---Advertisement---

सूर्यासमोर इतिहास रचण्याची संधी; होणार का पूर्ण ऑरेंज कॅपचं स्वप्न?

On: रविवार, जून 1, 2025 11:33 AM
---Advertisement---

पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल 2025 क्वालिफायर-2 आज म्हणजे रविवार, 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स पंजाब किंग्जला हरवून अभिमानाने अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. जर मुंबईला असे करायचे असेल तर त्यांचा मिस्टर कंस्टिन्संट सूर्यकुमार यादवला मोठी खेळी खेळावी लागेल. आयपीएल 2025 मध्ये सूर्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यामुळेच तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो ऑरेंज कॅपचा दावेदार देखील आहे. जर स्कायने आज मोठी खेळी खेळून मुंबई इंडियन्सना जिंकण्यात यश मिळवले तर तो ऑरेंज कॅप देखील जिंकू शकतो.

एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनकडे सध्या आयपीएल 2025ची ऑरेंज कॅप आहे. साईने 15 सामन्यांमध्ये 54.21च्या सरासरीने आणि 156.17 च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या आहेत.

तर दुसरीकडे, सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने हंगामामध्ये 67.30च्या सरासरीने आणि 167.83 च्या स्ट्राईक रेटने 673 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव आणि साई सुदर्शन यांच्यात फक्त 86 धावांचा फरक आहे. जर सुर्या आज 87 धावा करू शकला तर तो या शर्यतीत अव्वल स्थानावर येऊ शकतो. सूर्यकुमार यादवने आजपर्यंत आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप जिंकलेली नाही.

जर तो आज स्वस्तात बाद झाला तर तो ऑरेंज कॅप जिंकण्याची सुवर्णसंधी गमावेल. जर मंबई संघ आज हरला तर सुर्याला साई सुदर्शनला हरवण्याची दुसरी संधी मिळणार नाही.

जर विराट कोहलीला तिसऱ्यांदा ऑरेंज कॅप जिंकायची असेल, तर त्याला अंतिम फेरीत एक अविश्वसनीय खेळी खेळावी लागेल. कोहली सध्या 614 धावांसह यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या आणि नंबर-1 वर असलेल्या साई सुदर्शनमध्ये 145 धावांचा फरक आहे. या वर्षी कोहलीसाठी ऑरेंज कॅप जिंकणे कठीण दिसते. तथापि, ते अशक्य नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---