---Advertisement---

दे घुमा के! सुर्यकुमारचा ९९ मीटरला हेलिकॉप्टर षटकार पाहून हार्दिक पंड्याही झाला थक्क, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 1:00 AM
---Advertisement---

चेन्नई। एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी(१३ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडिन्सने १० धावांनी बाजी मारली. मुंबईच्या विजयात गोलंदाजांचा जसा महत्त्वाचा वाटा होता, तसाच झुंजार अर्धशतकी खेळी केलेल्या सुर्यकुमार यादवचाही होता. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्याने त्याच्या खेळीदरम्यान मारलेल्या एका षटकाराची सध्या चर्चा आहे.

सुर्यकुमारचा ९९ मीटरचा षटकार
मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने सुरुवात केली होती. पण केवळ डी कॉक २ धावांवरच डावाच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे तिसऱ्याच षटकात सुर्यकुमार यादवला फलंदाजीला यावे लागले. सुर्यकुमार आणि रोहितने मुंबईचा डाव सावरताना ७६ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, सुर्यकुमारने अर्धशतकी खेळी केली.

त्याने त्याचे अर्धशतकही षटकार मारत पूर्ण केले. त्याने १० व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजी करत असताना हेलिकॉप्टर शॉट खेळत ९९ मीटरचा खणखणीत षटकार ठोकला. यासह त्याने ३३ चेंडूत त्याचे १२ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले.

त्याने मारलेला हा षटकार पाहून मुंबईच्या ड्रेसिंगरुममध्ये बसलेला हार्दिक पंड्याही आश्चर्यचकीत झाला आणि त्याने उभे राहुन सूर्यकुमारचे कौतुक केले.

https://twitter.com/Spiderverse17/status/1381982778166681601

मात्र, हे अर्धशतक पूर्ण करताच सूर्यकुमार ३६ चेंडूत ५६ धावांची खेळी करुन बाद झाला. या खेळीत त्याने एकूण ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या अर्धशतकामुळे आणि रोहितने केलेल्या ४३ धावांच्या खेळीमुळे मुंबईला १५२ धावांचा टप्पा गाठता आला.

https://twitter.com/Nasirkh80026140/status/1381982543126306816

कोलकाताचा पराभव
कोलकाताने १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली होती. शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामीला ७२ धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे कोलकाता सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र गिलला ९ व्या षटकात राहुल चाहरने बाद केले. याबरोबरच त्याने राहुल त्रिपाठी(५) आणि ओएन मॉर्गन(७) यांनाही स्वस्तात बाद केले. एवढेच नाही तर चाहरने त्याच्या वैयक्तिक शेवटच्या षटकात अर्धशतकी खेळी करणाऱ्या नितीश राणाला बाद करत आपली चौथी विकेट मिळवली. राणाने ४७ चेंडूत ५७ धावा केल्या.

राणा बाद झाल्यानंतर मात्र कोलकाताच्या फलंदाजांना अखेरच्या चार षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी फार काही करु दिले नाही. जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी अखेरच्या ४ षटकांत कोलकाताला ३० धावांची गरज असताना केवळ १९ धावाच करु दिल्या. त्यामुळे मुंबईला या सामन्यात विजय मिळवता आला.

महत्त्वाच्या बातम्या –

केवळ २ षटकांत ५ विकेट्स घेणाऱ्या रसेलचा मोठा कारनामा; रोहित, झहीरलाही टाकले मागे

केकेआरविरुद्ध विजय मिळवला पण तब्बल २२५ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सवर ओढवली ‘ही’ नामुष्की

चर्चा तर होणारच! गेंड्याच्या संवर्धानानंतर आता रोहित शर्मा केकेआरविरुद्ध ‘हा’ संदेश देणारी बुटं घालत उतरला मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---