भारतीय संघाने वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. 12 जुलै रोजी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. यासाठी निवडलेला 16 सदस्यीय भारतीय संघात देशांतर्गत क्रिकेटचा स्टार फलंदाज सरफराज खानचे नाव नाहीये. असे असले तरी, संघ व्यवस्थापनाने या दौऱ्यासाठी निवडेलेला कसोटी संघ एका अर्थाने योग्य ठरताना दिसतो.
सरफराज खान (Sarfraz Khan) मागच्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये काही सामने खेळल्यानंतर सरफराज पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. दुलीप ट्रॉफी 2023च्या पहिल्या उपांत्य सामन्यात वेस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात आमना सामना होत आहे. पहिल्या दिवशी सरफराचा वेस्ट झोन संघ धावा करण्यासाठी झगडताना दिसला. सलामीवीर पृथ्वी शॉ, अनुभवी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), कर्णधार प्रयांक पांचाल आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) याने पहिल्या दिवशी सेंट्रल झोनसाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
सरफराज खान आयपीएल 2023मध्येही चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भारतीय निवडकर्त्यांनी यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाडला या दौऱ्यासाठी सरफराजच्या आधी प्राधान्य दिले. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांच्या याय निर्णयामुळे चांगलाच वाद पेटला होता. पण दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात सरफराजचे प्रदर्शन पाहिल्यानंतर चाहत्यांचा राक कमी होण्याची शक्यता आहे. सरफराजव्यतिरिक्त सूर्यकुमार आणि पुजारा यांनाही वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडले गेले नाहीये.
उपांत्या सामन्याच्या पहिल्या डावात सरफराज अवघ्या 12 धावांवर बाद झाला. संघाची धावसंख्या 63 असताना त्यांच्यार सुरुवातीच्या चार प्रमुख विकेट्स गेल्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट झोनने 8 बाद 218 धावा उभ्या केल्या. पृथ्वी शॉ 26, प्रियांक पांचाल 13, चेतेश्वर पुजारा 28, तर सूर्यकुमारने अवघ्या 7 धावांचे योगदान दिले. दरम्यान, दुलीप ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना नॉर्थ झोन विरुद्ध साउथ झोन असा सुरू आहे. (Suryakumar Yadav and Sarfraz Khan failed in Duleep Trophy)
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
महत्वाच्या बातम्या –
BREAKING । तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघातून अँडरसनचा पत्ता कट
पीव्ही सिंधूने साजरा केला 28वा बड्डे! भारताच्या बॅडमिंटन स्टारचे ‘हे’ जबरदस्त विक्रम जाणून घ्याच