वेस्ट इंडिज संघाने पाच टी20 मालिकेच्या 5व्या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्स ने पराभूत करत मालिकेवर विजय प्राप्त केला. दरम्यान भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने या सामन्यात 61 धावांची झंजावती खेळी केली. मात्र, भारताला पराभव स्विकारावा लागला. सूर्याने यावर्षी परत एकदा टी20 प्रकारात 1000 धावांचा आकडा पार केला आहे. त्याने गेल्या वर्षी देखिल हा कारणामा केला होता. भारतीय संघासाठी हा विक्रम करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी20 प्रकारात सलग दोन वर्षात 1000 धावांचा आकडा पार करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. याआधी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने हा विक्रम केला होता. 2019 अणि 2020 या दोन वर्षात त्याने 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता सूर्याने हा कारणामा आपल्या नावावर केला आहे. तो या यादीत दुसरऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने 2022 अणि 2023 या दोन्ही वर्षात 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी20 मध्ये सूऱ्याचा फॉर्म
सूर्यकुमार टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेकमध्ये अव्वल स्थानाचा फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 5 टी20 सामन्याच्या 4 डावात 41.50 च्या सरासरी सोबत 146.90 च्या स्ट्राईक रेटने 166 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. त्याचबरोबर त्याने या मालिकेत 16 चौकार आणि 8 षटकार मारले. याआधी खेळलेल्या वनडे मालिकेत सूर्या फ्लॉप ठरला होता.
अशी राहिली आहे सूर्यकुमारी टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सूर्यकुमार यादवने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय प्रकारात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 53 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 50 डावांमध्ये त्याने 46.02 च्या सरासरीने सोबत 172.70 च्या स्ट्राईक रेटने 1841 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 शतके आणि 15 अर्धशतके झळकली आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 धावा आहे. (suryakumar yadav become a 2nd indian player he score to 1000 runs in tow years)
महत्वाच्या बातम्या-
आकडे बोलतायेत! 2021 पासून भारतीय संघाने अभिमान करावा अशी कामगिरी केलीच नाही
मालिका गमावली पण तिलक कमावला! टी20 मालिकेतून टीम इंडियाला मिळाला फ्युचर स्टार