जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनुभवी खेळाडूंसहित युवा खेळाडूंचाही बोलबाला असतो. देशांतर्गत क्रिकेट गाजवणारे कित्येक अनकॅप खेळाडू तर आयपीएलमधील नेत्रदीपक प्रदर्शनाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या सूर्यकुमारच्या नशीबी ती संधी अद्यापही आलेली नाही. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात बीसीसीआयने या शिलेदाराला दुर्लक्षित केले आहे.
हा पराक्रम करणारा पहिलाच अनकॅप खेळाडू
अशातच मंगळवारी (३ नोव्हेंबर) शारजाहमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात तो २९ चेंडूत ५ चौकार लगावत केवळ ३६ धावाच करु शकला. पण या धावांसह त्याने या हंगामातील ४०० धावांचा आकडा ओलांडला आहे.
विशेष म्हणजे, एका आयपीएल हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१८ आणि २०१९मध्येही त्याने ४००पेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत. त्याने २०१८ साली १४ सामन्यात ५१२ धावा आणि २०१९ साली १६ सामन्यात ४२४ धावा केल्या होत्या.
त्यामुळे लागोपाठ ३ हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करणारा सूर्यकुमार पहिलाच अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला) खेळाडू ठरला आहे. अनकॅप खेळाडूंमध्ये कोणत्याही खेळाडूला सलग दोन हंगामात ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
त्यामुळे या कमालीच्या पराक्रमानंतर तरी सूर्यकुमारसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुली होतील का? निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संधी देईल का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
जल्दी से भागो रे भैया! डी कॉकच्या जबरा सिक्सरचा चेंडू स्टेडियम बाहेर, चाहता बॉल घेऊन फरार
पावरप्लेमध्ये SRHच्या गोलंदाजाची कमाल; झहीर खानसारख्या दिग्गजालाही टाकले मागे
क्रिकेटपेक्षा खेळाडूचा जीव महत्त्वाचा; ‘त्या’ चित्तथरारक घटनेनंतर सचिनची आयसीसीला मोठी विनंती
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?