---Advertisement---

मॅडनेस टॉप लेव्हल..! सूर्यकुमार यादवने बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन, मजेशीर फोटो केले शेअर

On: सोमवार, ऑगस्ट 19, 2024 6:45 PM
suryakumar yadav sister
---Advertisement---

देशात सध्या रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. भारतीय क्रिकेटपटूही त्यांच्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या बहिणीकडून राखी बांधून घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही त्याच्या बहिणीसोबतचे गमतीदार फोटो सोशल मीडियावर शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याची बहीण दिनल यादवसोबत एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. क्लिपमध्ये क्रिकेट स्टार आपल्या बहिणीसोबत मस्ती करताना दिसत आहे. आपल्या बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना सूर्यकुमारने लिहिले, ‘रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, वेडेपणा वरच्या स्तरावर आहे.’

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सूर्यकुमारची बहीण दिनल यादवनेही तिच्या भावासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘भैयाला राखीच्या शुभेच्छा, एकत्र राहण्याचा आनंद आमच्या नि:शब्द प्रेमासारखा राहू दे. नेहमी आमच्या खिचडीच्या रेसिपीतील लोणचे राहा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dinal Yadav (@dinal_instalove)

सूर्यकुमारची बहीण दिनल ही अमेरिकन बहुराष्ट्रीय सौंदर्यप्रसाधन कंपनी ‘द एस्टी लॉडर’ कंपनीजमध्ये व्हिज्युअल मर्चेंडाइझिंग प्लॅनर म्हणून काम करते. तिने मुंबईतील पर्ल अकादमीमधून फॅशन बिझनेसमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

सूर्या दुलीप ट्रॉफी खेळणार आहे
दरम्यान सूर्यकुमार यादव सध्याच्या बुची बाबू ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचा भाग आहे. बुची बाबू ट्रॉफी व्यतिरिक्त, सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या 17 व्या हंगामात देखील सहभागी होणार आहे. त्याला रुतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील टीम सी मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याने यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. ही मालिका भारतीय संघाने 2-1 च्या फरकाने जिंकली होती. मात्र टी20 मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतून मात्र सूर्यकुमारला वगळण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!

ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---