कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात तिसरा आणि अखेरचा टी२० सामना (3rd T20I) रविवारी (२० फेब्रुवारी) ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने (Suryakumar Yadav) मोलाचे योगदान दिले. त्याने तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने ही अर्धशतकी खेळी केल्यानंतर वेगळ्याप्रकारे सेलिब्रेशनही केले, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने २१० च्या स्ट्राईकरेटने ३१ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांसह ६५ धावांची तुफानी खेळी केली. त्याने जेव्हा त्याचे अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याने हात जोडून नमस्कार करत सेलिब्रेशन केले. यादरम्यान सूर्यकुमारला पाहून कर्णधार रोहित शर्माही खूश असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे (Suryakumar Yadav celebration after his fifty).
ही घटना भारताच्या डावातील अखेरच्या षटकात घडली. त्यावेळी वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमारने लाँग ऑफच्या वरून षटकार मारला आणि अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने सेलिब्रेशन करताना नमस्कार केला.
https://twitter.com/SportsHustle3/status/1495422487126941698
https://twitter.com/SportsHustle3/status/1495422405031849984
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८४ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमारने अर्धशतक केले, तर इशान किशनने ३४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने २५ धावांची खेळी केली. याशिवाय अखेरच्या काही षटकांत वेंकटेश अय्यरनेही आक्रमक खेळताना १९ चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून ५ गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून निकोलस पूरनने ४७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. पण त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. वेस्ट इंडिजचा डाव २० षटकांत ९ बाद १६७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर, वेंकटेश अय्यर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडिया ६ वर्षांनी बनली टी२० क्रिकेटमध्ये ‘नंबर वन’; रोहित ‘असा’ पराक्रम करणारा धोनीनंतर दुसराच
टीम इंडियाचं टेंशन वाढलं! प्रमुख गोलंदाज जखमी, श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता






