मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई संघाला अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. मुंबईने साखळी फेरीतील १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत. या निराशाजनक प्रदर्शनानंतर मुंबई संघ पुढील हंगामात दमदार पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशात मुंबई संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आगामी हंगामातील संघाचे लक्ष्य स्पष्ट केले आहे.
मुंबई संघाद्वारे (Mumbai Indians) इंस्टाग्रामवर सूर्यकुमारचा (Suryakumar Yadav) व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सूर्यकुमार मुंबई संघाचे इरादे (Mumbai Indians Goal) स्पष्ट करताना संघ आयपीएलचा खिताब जिंकत पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त करत आहे.
सूर्यकुमारने व्हिडिओत म्हटले की, “आम्हाला काहीही करून सहावी आयपीएल ट्रॉफी आणायची आहे. दुर्भाग्याने यावर्षी असे होऊ शकले नाही. परंतु पुढच्या वर्षी काहीही करून आम्हाला त्या ५ आयपीएल ट्रॉफींपुढे आणखी एक ट्रॉफी उभी करायची आहे. २०२३ मध्ये (IPL 2023) आम्हाला ही कामगिरी करून दाखवायची आहे. डेवाल्स ब्रेविस या सेटअपमध्ये आता नवा आला आहे, त्यामुळे त्याला हे समजून घ्यावे लागेल की ट्रॉफी जिंकण्यासाठी काय करावे लागते.”
दरम्यान सूर्यकुमार दुखापतीमुळे मुंबईकडून हंगामातील सर्व सामने खेळू शकलेला नाही. परंतु त्याने कमी सामने खेळतानाही प्रभावी प्रदर्शन केले आहे. सूर्यकुमारने चालू हंगामात ८ सामने खेळताना ३०३ धावा केल्या आहेत. ४३.२९च्या सरासरीने त्याने या धावा फटकावल्या आहेत. परंतु दुखापतीमुळे तो अर्ध्यातूनच संपूर्ण हंगामातून बाहेर झाला होता.
दुसरीकडे मुंबई संघासाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम विसरण्यासारखा राहिला आहे. मुंबईने चालू हंगामात त्यांचे सुरुवातीचे आठही सामने गमावले आहेत. मुंबईने कोणत्या हंगामात सलग इतके सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. अशा निराशाजनक सुरुवातीनंतर मुंबईचा संघ १४ पैकी १० सामने गमावत व केवळ ४ सामने जिंकत गुणतालिकेत तळाशी राहिला. तसेच आयपीएल २०२२मधून बाहेर पडणाराही पहिलाच संघ ठरला.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वॉर्न या जगात नसल्याने मन उदास आहे’, आयपीएलपूर्वी बटलरने कर्णधार सॅमसनपुढे मांडल्या भावना
बाबो! आयपीएल फायनलपूर्वी दिसली आजवरची सर्वात मोठी जर्सी, गिनीज बुकमध्ये झालीय नोंद; पाहा Photo