मंगळवारी (दि. 9 मे) मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभवाची धूळ चारली. मुंबईने आयपीएल 2023च्या 54व्या सामन्यात आरसीबीला 6 विकेट्सने पराभूत कले. या विजयात सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि ईशान किशन यांचे मोलाचे योगदान राहिले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत गरुडझेप घेत थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. असे असले, तरीही सूर्यानेही खास पराक्रम गाजवला आहे. चला तर सूर्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला 6 विकेट्स गमावत 199 धावाच करता आल्या. हे आव्हान मुंबई संघाने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत 200 धावा करून पार केले. यासोबतच 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावांचे योगदान देत खास विक्रम रचला.
सूर्यकुमार यादव याने या सामन्यात फक्त 35 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 83 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. या धावा करताच सूर्यकुमार यादव याने आयपीएल कारकीर्दीत 3000 धावांचा टप्पा पार केला. या सामन्यानंतर त्याच्या आयपीएलमध्ये 3020 धावा पूर्ण झाल्या. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये 102 षटकार पूर्ण केले आहेत.
Milestone 🔓
3⃣0⃣0⃣0⃣ IPL runs for @surya_14kumar ! 🙌🙌
Well done, SKY! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/1pglSH1ubk
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
विशेष म्हणजे, सूर्याने यापैकी 2412 धावा या मुंबई संघाकडून केल्या आहेत, तर उर्वरित कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना त्याने 608 धावा चोपल्या होत्या.
आयपीएल 2023मधील कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेतील सूर्यकुमारची कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 11 सामन्यात 34.18च्या सरासरीने 376 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, सूर्याने यादरम्यान 41 चौकार आणि 18 षटकारही मारले आहेत. आता पुढील सामन्यात सूर्या कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Suryakumar yadav completed 3000 runs in ipl career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! मॅक्सवेलने मारला विचित्र शॉट, चेंडू डायरेक्ट बाऊंड्रीच्या पलीकडे; तुम्हीही कधीच पाहिला नसेल
नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत