भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग आहे. त्याला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी आणखी काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने तो सध्या मुंबई येथील आपल्या घरी आहे. मोकळ्या वेळात त्याने नुकताच मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
मुंबई के गलियों में क्रिकेट खेलते हुए दिखें सूर्या कुमार #suryakumaryadav #cricketyatri pic.twitter.com/hQef21S4TG
— Cricketyatri (@cricketyatri) March 5, 2023
मुंबई येथे असताना मुंबईचे अनेक क्रिकेटपटू गल्ली क्रिकेटचा आनंद घेताना दिसतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर यांचे असे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी नुकताच आता सूर्यकुमारचा एक व्हिडिओ असाच सोशल मीडियावर ट्रेंड झालाय. यामध्ये तो अनेक लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसला.
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या काही मुलांनी सूर्याला थांबवल्यानंतर त्याला फलंदाजी करण्याची विनंती केली. तसेच त्यावेळी या मुलांनी त्याला सुपला शॉट म्हणजेच स्कूप फटका खेळण्याचा आग्रह केला. त्याने देखील या मुलांच्या आग्रहाला मान देत हा फटका खेळून दाखवला.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टेनिस क्रिकेटमधील एक फलंदाज स्कूप मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी समालोचकाने या फटक्याला सुपला शॉट असे नाव दिलेले. पुढे त्याच फटक्यावर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक रील शेअर करत सूर्यकुमार यादव अशा पद्धतीने फटका मारत असल्याचे दाखवले होते. तेव्हापासून या फटक्याला अनेक जण सुपला शॉट असेच म्हणत आहेत. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याने या फटक्याला पल्लू शॉट असे नाव दिलेले.
(Suryakumar Yadav Enjoying Gully Cricket In Mumbai)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
बावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?