ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup)भारतीय संघ जाहीर झाला. तर या स्पर्धेआधी भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार आहेत. या तिन्ही टी20 मालिकांसाठी भारताच्या संघात सूर्यकुमार यादव याला निवडले आहे. तो या वर्षी भारताचा टी20 प्रकारामध्ये महत्वाचा खेळाडू ठरत आहे. तर विश्वचषकासाठी त्याने त्याची पूर्वतयारी स्पष्ट केली आहे.
भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने विश्वचषकासाठी कशी तयारी सुरू आहे हे सांगितले आहे. सामन्याच्या दोन दिवसआधी तो बॅटला हातदेखील लावत नाही, तर सामन्याच्या एक दिवस अगोदर तो सुट्टी घेतो आणि हा दिवस पत्नीसोबत घालवतो. यादरम्यान तो क्रिकेटबद्दल काहीच बोलत नाही, असे त्याने सांगितले आहे.
सूर्यकुमार टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होता. यावेळी त्याला प्रश्न करण्यात आला की, तो सामन्याच्या एक दिवसआधी कसा गेम प्लान करतो? नेटमध्ये कसून सराव करतो का काही रणनीती आखतो? या प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत.
वरील प्रश्नामधील एकाचे उत्तर देताना सूर्यकुमार म्हणाला, “मागील चार वर्षापासून मी एकाच रणनीतीने खेळलो आहे. याचा मला खूप फायदाही झाला आहे. सामन्याच्या एक दिवसाआधी मी सुट्टी घेतो. तसेच जेवढा सराव करायचा आहे तो सराव दोन दिवसांत करतो. तर एक दिवसाआधी मी पत्नीसोबत वेळ व्यतित करतो आणि क्रिकेटबाबत काहीच चर्चा करत नाही.”
सूर्यकुमार पुढे म्हणाला, “मी चांगला खेळो अथवा वाईट माझी पत्नी मला नेहमीच सपोर्ट करते. तिने माझ्या डोक्यात एक विचार पक्का केली आहे, तो म्हणजे मला जसे आहे तसे राहिले पाहिजे.”
सूर्यकुमारने काहीच दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) तो 32 वर्षाचा झाला. त्याने पत्नीसोबत वाढदिवस सेलेब्रेट करताना काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले.
सूर्याचे आंतरराष्ट्रीय टी20तील शतक
सूर्यकुमारने 2021मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. त्याला पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, मात्र त्याने दुसऱ्याच सामन्यात 57 धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 36.86च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. हे शतक (117 धावा) त्याने इंग्लंडमध्ये इंग्लंड विरूद्ध केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग स्पर्धेत द व्हर्लविंड्स, बॉल ब्रेकर्स संघांचा सलग दुसरा विजय
‘बेबी.. स्विटी..’, धोनी अन् पत्नी साक्षीचा क्यूट संवादाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल






