टी20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतल्यानंतर टीम इंडियाच्या जल्लोषला सुरुवात झाली. भारतीय संघ दिल्लीहून मुंबईला पोहचल्यानंतर मरिन ड्राइव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत विश्वविजेत्या संघाचे विजयी परेड करण्यात आले. विजयी परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सर्व खेळाडूंनी आपापल्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान घरी पोहोचताच सर्व चॅम्पियन्ससाठी सेलिब्रेशनची खास व्यवस्था करण्यात आली होती. असचं सूर्यकमार यादव सोबत पहायला मिळाले.
अफलातून झेल पकडून टीम इंडियाच्या विश्वविजेत्या बनण्यामध्ये मोठे योगदान दिलेल्या सूर्यकुमार यादवचे त्याच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले. सूर्यकुमारच्या घरी पोहचल्यानंतर त्याचे ढोल ताशा वाजवत त्याचे स्वगत झाले.
Grand welcome of world cup champions SKY at his residence by him family members 🥹❤️#SuryakumarYadav pic.twitter.com/zjOm6tru5R
— sheenu. (@onlyskymatters) July 5, 2024
व्हिडिओमध्ये पहायला मिळत पावसात देखील सूर्याकुमार यादवचे जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यासोबत त्यांची पत्नी देखील दिसत आहे. कुटुंबीयांकडून पांरपारिक पद्धतीने सूर्यकुमार यादवचे करण्यात आले. यादरम्यान त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालण्यात आला. नंतर कुटुंबीयंकडून त्याचे दिव्याने औक्षण करण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तत्तपूर्वी टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवून टी20 विश्वचषक 2024 ची ट्राॅफी आपल्यानावे केली. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चालली नसली तरी, त्याच्या अविश्वसनीय कॅचने मात्र टीम इंडिया या सामन्यात मोक्याच्या क्षणी सामना ताब्यात घेतला. सूर्यकुमार यादवने यंदाच्या टी20 विश्वचषकात 8 सामन्यात 199 धावा केल्या होत्या. फायनलमध्ये झेलेल्या त्या कॅचमुळे सूर्यकुमार यादवला सर्वेत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यात आले होते.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाचे नवे पर्व सुरु, भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेला आजपासून सुरुवात
दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा राज्य सरकारकडून विधानभवनात सत्कार