इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने उभे ठाकले. मोठ्या धावसंख्येच्या होऊनही एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली. मुंबईच्या विजयाचा नायक सूर्यकुमार यादव हा ठरला. त्याने केलेल्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबईने 200 धावांचे आव्हान अगदी सहजरीत्या गाठले.
सलग तिसऱ्या सामन्यात विजयासाठी 200 धावांचे आव्हान मिळाले असताना सूर्यकुमार यादव याने या सामन्यात फक्त 35 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 83 धावा तडकावल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना नेत्रदीपक फटकेबाजी करताना 200 धावांचे आव्हान अगदी छोटे सिद्ध केले. या खेळी दरम्यान त्याने आपला 200 धावा पार करतानाचा सर्वोत्तम खेळ पुन्हा एकदा दाखवला.
यापूर्वी पंजाब विरुद्धच्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना त्याने 26 चेंडूवर 57 धावा केलेल्या. गुजरातविरुद्ध 23 धावा करण्यात त्याला यश आलेले. हे दोन्ही सामने संघ पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर मुंबईने 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना सलग तीन सामने जिंकले आहेत. यामध्ये सूर्याने राजस्थानविरुद्ध 22 चेंडूवर 55, पंजाबविरुद्ध 31 चेंडूत 66 व त्यानंतर आता 35 चेंडूंत 83 धावा त्याने काढल्या आहेत.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कर्णधार फाफ डू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाला 6 विकेट्स गमावत 199 धावा करता आल्या. हे आव्हान मुंबई संघाने 16.3 षटकात 4 विकेट्स गमावत 200 धावा करून पार केले. सूर्यकुमार यादवसह ईशान किशन व नेहल वढेरा यांनी दमदार खेळ केल्याने मुंबईन 6 विकेट्सने मोठा विजय मिळवला.
(Suryakumar Yadav Great Batting Display In IPL 2023 While Chasing 200)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेत चमकला मुंबईचा ‘सूर्य’, 83 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला ‘हा’ जबरदस्त विक्रम, वाचाच
आयपीएलमधील रोहितचा सर्वात वाईट काळ! मागच्या पाच इनिंग्ज विसरलेल्याच बऱ्या





