जगभरात २१ जून हा दिवस ‘जागतिक योगा दिन’ म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच २१ जून २०२२ हा दिवस ‘आठवा जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. या जागतिक योगा दिनानिमित्त जगभरातील अनेक सेलीब्रेटी आणि प्रसिद्ध कलाकारापासून ते खेळाडूंपर्यंत सर्वांनी आपले योगा करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. यावर्षीही तसेच काही फोटोंमधून आपली फिटनेस दाखवत काही भारतीय क्रिकेटपटूंपासून ते महिला ब़ॉक्सिंग विश्वविजेती भारतीय निकहत जरीनपर्यंत सर्वांनी आपले योगा करतानाचे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले आहेत.
https://twitter.com/surya_14kumar/status/1539113175123210244?s=20&t=dsocqXSXQw5nAueMzWr49Q
१. सुर्यकुमार यादव
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सुर्यकुमार यादवने देखील आपला योगो करतानाचा एक फोटो त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर टाकला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सच्या जर्सीमधील योग करताना दिसत आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुर्यकुमार यादवने हा फोटो टाकत सर्वांना जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/harbhajan_singh/status/1539108207846621186?s=20&t=_hwZAKhqGXhu6cXEOk2jeQ
२. हरभजन सिंग
‘द टर्बनेटर’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने देखील आपला एक योग करतानाचा एक फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तो आपल्या घरातच योगा करताना दिसून येत आहे आणि सर्वांना योगा करण्याचा आग्रह करत आहे.
https://twitter.com/mayankcricket/status/1539110064333914112?s=20&t=KTue7FblbvKKwjXLEleK-Q
३. मयंक अग्रवाल
आयपीएलच्या पंजाब किंग्स संघाचा कर्णधार आणि भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल सुद्धा आपल्या अधिकृत अकाऊंटवर टाकलेल्या फोटोमध्ये योगा करताना दिसतो. मयंकने कॅप्शन लिहले आहे, ‘योगो से ही होगा’.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1539088763871064064?s=20&t=3iL3kK63CthI20pE61T-qw
४. ऋतुराज गायकवाड
आयपीएल फ्रॅंचाइजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर चेन्नई सुपर किंग्सच्या ४ खेळाडूंचे योगा करतानाचा फोटो कोलाज करुन पोस्ट केला आहे आणि लिहले आहे, ‘सुपर योगा डे टू ऑल’.
https://twitter.com/GautamGambhir/status/1539115342471041028?s=20&t=eZnH7ROsFttNjdGBScorMQ
५. गौतम गंभीर
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो योगा करताना दिसत आहे. त्याचवबोबर त्याने कॅप्शन द्वारे सर्वांना जागतिक योगा दिनानिमित्त (International Yoga Day) शुभेच्छा देत योगा करण्या मागच्या गोष्टींचे महत्व सांगितले आहे.
https://twitter.com/cheteshwar1/status/1539129089348763648?s=20&t=Zihv9GlfqZDt5dDA5Whquw
६. चेतेश्वर पुजारा
‘द वॉल’ म्हणून संबोधले जाणारे आणि सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाची नवीन भिंत म्हणून ओळखला जात असलेला फलंदाज चेतेश्वर पुजाराने देखील इंग्लंड दौऱ्यावर असूनही आपला एक योगा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://twitter.com/nikhat_zareen/status/1539128287112355841?s=20&t=k5UemesaVMVGkjxuLneYqw
७. निखत जरीन
विश्वविजेती भारतीय महिला ब़ॉक्सर निखत जरीनने सुद्धा बॉक्सिंग रिंगमध्ये योगा करतानाचा फोटो अधिकृत ट्वीटरवर टाकत तिने कॅप्शनमध्ये योगोचे महत्वदेखील सांगितले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चोट तो बहाना है, सुनिल शेट्टी की लडकी को घुमाना है..! केएल राहुल होतोय ट्रोल
टी२०चा दांडगा अनुभव अन् दमदार फॉर्म असूनही ‘या’ खेळाडूला टी२० विश्वचषकात नाही मिळणार जागा






