दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना भारताने 16 धावांनी जिंकला. या विजयानंतर भारतायने या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशा अंतराने जिंकली. मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. सूर्यकुमारच्या या वादळी खेळीचा फायदा संघाला विजय मिळवण्यासाठी झालाच, पण त्याच्या नावावर एक मोठा विक्रम देखील नोंदवला गेला आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने या सामन्यातील केलेल्या 61 धावा 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या 1000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमार सर्वात मकी चेंडूत स्वतःच्या 1000 टी-20 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 573 चेंडूत आणि 40 च्या सरासरीने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियान दिग्गज ग्लेन मॅक्सवेल याच्या नावावर होता. मॅक्सवेलने 603 चेंडूत 1000 टी-20 धावा केल्या होत्या. आता मॅक्सवेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सर्वात कमी चेंडूत 1000 टी-20 धावा करणारे फलंदाज –
सूर्यकुमार यादव – 573 चेंडू
ग्लेन मॅक्सवेल – 603 चेंडू
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमाल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे हा निर्णय भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. त्याने या सामन्यात देखील सूर्यकुमारच्या साधीने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावा केल्या, तर त्याच्या साधीने कर्णधार रोहित शर्मा देखील 37 चेंडूत 43 धावांची खेळी करून बाद झाला.
फलंदाजांच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने मर्यादित 20 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर 237 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकी संघासाठी क्विंटन डी कॉक आणि डेविड मिलर यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन कले. डी कॉकने 48 चेंडूत 69 धावा केल्या, तर मिलरने 47 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी केली. मिलरने या धावा 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने केल्या. परंतु ते स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या विजयानंतर भारतीय संघाने देखील मोठा विक्रम केला आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यापूर्वी एकदाही भारताने मायदेशातील टी-20 मालिकेत आफ्रिकी संघाचा पराभव केला नव्हता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिलांशी नागीन निघाली! गुवाहाटी टी20 मध्ये चक्क सापाने मारली मैदानात एंट्री; पाहा व्हिडिओ
सामना गमावला मात्र ‘किलर मिलर’च्या शतकाने जिंकली सर्वांची मने