इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा सुपर फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव या हंगामातून बाहेर झाला आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. ही बातमी मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामासाठी बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत करून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.”
https://www.instagram.com/p/CdVrEPkvHsa/?igshid=MDJmNzVkMjY=
महत्त्वाचं म्हणजे, सोमवारी (दि. ०९ मे) मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (MIvsKKR) सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वीच मुंबईला मोठा फटका बसला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने त्याने ८ सामन्यात ४३.२९च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. तसेच, पहिल्या क्रमांकावर तिलक वर्मा (Tilak Varma) आहे. त्याने १० सामन्यात ४१च्या सरासरीने ३२८ धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादवची आयपीएल कारकीर्द
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत १२३ आयपीएल (IPL) सामने खेळले आहेत. त्यातील १०८ डावात फलंदाजी करताना त्याने ३०.०५च्या सरासरीने २६४४ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने १६ अर्धशतकेही झळकावली आहेत.
मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२२मधील कामगिरी
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसाठी हा हंगाम खूपच खराब गेला आहे. जबरदस्त खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना हा हंगाम गाजवता आलेला नाहीये. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत या हंगामातील १० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी फक्त २ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना उर्वरित ८ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या ब्रावोला धोनीचा टोमणा; म्हणाला, ‘…ओल्ड मॅन’
पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज
शार्दुल ठाकूरला शिवम दुबेने दाखवला दबंग अंदाज; खडे-खडे भिरकावला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा गगनचुंबी षटकार