---Advertisement---

बांगलादेश मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

---Advertisement---

सध्या भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) 2024-2025च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. गेल्या आठवड्यात बुची बाबू स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. सध्या त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सूर्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी संघात खेळण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

सूर्यकुमारला गेल्या आठवड्यात टीएनसीए इलेव्हनसाठी दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरही आला नाही. त्यावेळी मुंबई संघाच्या व्यवस्थापनाने सूर्याला गंभीर दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी पाठवले नसल्याचे मान्य केले होते.

दुलीप ट्राॅफीमधून सूर्या बाहेर पडलाच आहे. पण सूर्याशिवाय मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या दोन वेगवान गोलंदाजांनाही आजारपणामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील या आगामी स्पर्धेत भाग घेणार नाही, ज्यावर बीसीसीआयने अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नाही. सिराज आणि मलिकच्या जागी नवदीप सैनी आणि गौरव यादव खेळताना दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

उर्वरित आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ‘हे’ 3 रेकाॅर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्य
भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक; स्टार बॅडमिंनपटूची कमाल! लवकरच मेडलची बेरीज दुहेरी अंकात?
BAN vs PAK: पाकिस्तानचा दुसऱ्यांदा धु्व्वा उडवण्यासाठी बांगलादेशला 143 धावांची गरज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---