भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. पण टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धारदार कामगिरी अद्याप कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील संघाला (8 नोव्हेंबर) पासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 4 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. जर भारताने आपला विजयी रथ सुरूच ठेवला, तर सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास रचू शकतो.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय संघाने आधी श्रीलंकेचा टी20 मालिकेत 3-0 असा पराभव केला आणि नंतर बांगलादेशचा देखील धुव्वा उडवला. भारतीय संघाने आतापर्यंत सलग 6 सामने जिंकले आहेत. आता भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 4 टी20 सामने खेळायचे आहेत, इथेही भारतीय संघाची जिंकण्याची जिद्द कायम राहिली तर संघ इतिहास रचण्याच्या जवळ येईल.
भारतीय संघाच्या नावावर सलग 12 विजयांचा रेकाॅर्ड आहे. त्यापैकी काही सामने विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली तर काही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली जिंकले आहेत. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 4-0 असा विजय मिळवला, तर ते या रेकाॅर्डपासून फक्त 2 पावले दूर असेल. मात्र हा रेकाॅर्ड मोडण्यासाठी संघाला आपला विजयी रथ चालूच ठेवावा लागेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, रवी विष्णोई, आवेश खान, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
“तो जागतिक दर्जाचा खेळाडू पण…”, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे केएल राहुलला चँलेज
‘संपूर्ण जग तुझ्याकडे आशेने पाहतेय…’, युवराज सिंगच्या कोहलीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
विराट आणि बाबर एकाच संघातून खेळणार, 17 वर्षांनंतर पुन्हा योगायोग जुळून येणार?