भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा क्रिकेटपटू सुर्यकुमार यादवला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संधी मिळू शकते.
माध्यमातील वृत्तानुसार सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्याआधी भारतीय संघाला क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला काहीदिवस आधीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जावे लागणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका खेळणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचr निवड समीती सुर्यकुमार यादवचा मर्यदीत षटकांच्या मालिकांसाठी फिनिशर म्हणून विचार करत आहे.
मर्यादीत षटकांसाठी सध्या भारतीय संघात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, केएल राहुल हे पर्याय मधल्या फळीतील फलंदाजीसाठी आहेत. पण यामध्ये सुर्यकुमारलाही संधी दिली जाऊ शकते. सुर्यकुमारने मागील काही महिन्यांमध्ये त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच त्याने भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी केली आहे.
त्याशिवाय कसोटीत रोहित शर्मा, मयंक अगरवाल या नियमित सलामीवीरांव्यतिरिक्त शिखर धवनला पर्यायी सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. तसेच पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे देखील निवडीसाठी उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर हार्दिक पंड्या त्याच्या दुखापतीमुळे आयीपएलमध्ये गोलंदाजी करताना दिसलेला नाही. त्यामुळे जर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानही गोलंदाजी करणार नसेल तर त्याचा कदाचीत वनडे आणि कसोटीसाठी विचार केला जाणार नाही. त्याच्याऐवजी वनडेत शिवम दुबे किंवा विजय शंकरला संधी मिळू शकते.
तसेच इशांत शर्मा आणि भूवनेश्वर कुमार आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाले असल्याने ते या दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजचा विचार केला जाऊ शकतो.
यष्टीरक्षक म्हणून पंत, राहुल आणि वृद्धिमान साहा हे पर्याय असतील, तर फिरकीपटू म्हणून कसोटीसाठी रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि कुलदीप यादवला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जवळपास ३२ जणांचा संघ पाठवणार असल्याने अश्विनला मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठीही संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
-पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन
ट्रेंडिंग लेख-
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ