भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या सूर्यकुमार यादव याने आपल्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत शानदार नाबाद शतक झळकावले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सूर्याने वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही पद्धतीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने 33 चेंडूवर आपले 14 वे आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुढील 50 धावांसाठी केवळ 12 चेंडू घेत 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 219 पेक्षा जास्त होता.
CENTURY for @surya_14kumar
A third T20I 💯 in just 43 innings.
Take a bow, Surya!#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/HZ95mxC3B4
— BCCI (@BCCI) January 7, 2023
या शतकासह त्याने टी20 क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावे नोंद केले. सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सलामीवीर नसताना तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स, दक्षिण आफ्रिकेचे डेव्हिड मिलर व रायली रुसो व सर्बियाच्या वेस्ली डूनबार यांनी मधल्या फळीत फलंदाजी करताना प्रत्येकी दोन शतके झळकावलेली आहेत.
याव्यतिरिक्त सूर्यकुमारच्या नावे भारताकडून दुसरे सर्वात वेगवान टी20 शतक जमा झाले. 35 चेंडूंवर शतक झळकावणारा रोहित शर्मा या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे. याच खेळीवेळी त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावांचा पल्ला देखील पार करण्यात यश मिळवले. तसेच, या खेळीत 9 षटकार ठोकत त्याने मधल्या फळीत एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रमही नोंद केला.
(Suryakumar Yadav List Many Records With His 3rd Century In T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अशी राहिलीये टीम इंडियाच्या नव्या निवडसमिती सदस्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द; अनुभवाच्या बाबतीत…
वनडेत द्विशतक मारलेला ईशान टी20 मध्ये ठरतोय फिसड्डी! आकडे दाखवतायेत वस्तुस्थिती