भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममधून जात आहे. टी20 क्रिकेटमध्ये तर तो अक्षरशः धावांचा रतीब घालताना दिसतोय. टी20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने मालिकावीर पुरस्कार मिळाला. त्याच्या याच शानदार फॉर्मचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आता उत्सुक असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या बांगलादेश दौऱ्यावर त्याचा कसोटी संघात समावेश केला जाऊ शकतो.
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यावर तीन वनडे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप तंदुरुस्त न झाल्याने कसोटी संघात सूर्यकुमारची वर्णी लागू शकते. सूर्यकुमार भारतीय संघासाठी पदार्पण केल्यापासून उत्कृष्टरित्या खेळताना दिसतोय. तसेच तो सध्या टी20 क्रमवारीतही अव्वलस्थानी आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याला कसोटी खेळण्याची देखील इच्छा असल्याचे म्हटलेले. त्यामुळे त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.
सूर्यकुमारने आत्तापर्यंत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना चांगली कामगिरी केलेली दिसून येते. त्याने मुंबईसाठी 77 प्रथमश्रेणी सामने खेळताना 44.01 च्या सरासरीने 5326 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 14 शतके देखील आलीत.
दुसरीकडे, सध्या भारताचा सर्वात अनुभवी अष्टपैलू असलेल्या जडेजाला आशिया चषकानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी20 विश्वचषकातही सहभागी झाला नव्हता. तसेच, शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी न्यूझीलंड दौऱ्यासाठी देखील त्याचा विचार झाला नाही. मात्र, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला निवडले गेले होते. मात्र, आता त्याचे पुनरागमन लांबण्याची शक्यता आहे.
(Suryakumar Yadav Might Get Chance Against Bangladesh In Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीवर आली भांडी घासण्याची वेळ, फोटो होतोय भलताच व्हायरल
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’