---Advertisement---

स्वतः सूर्याने दिले आपल्या व विराटच्या जोडीला नाव; सोशल मीडियावर होतेय जोरदार ट्रेंड

On: गुरूवार, ऑक्टोबर 27, 2022 9:20 PM
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये 8वा टी20 विश्वचषकाचा महाकुंभमेळा सुरू आहे. या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 11वा सामना भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. टी20 विश्वचषकातील हा भारताचा दुसराच सामना होता. भारतीय संघाने खेळाच्या तीनही प्रकारात शानदार कामगिरी करत आपला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात नाबाद अर्धशतके करणारे विराट कोहली व सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचे नायक ठरले. सामना संपल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे आता ते चर्चेत आले आहेत.

पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकवणारी खेळी करणाऱ्या विराटने या सामन्यातही 37 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 44 चेंडूत 62 धावा चोपल्या. यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार सामील होते. पाकिस्तान विरुद्ध स्वस्तात बाद झालेल्या सूर्यकुमार यादवने या सामन्यात आपले योगदान दिले. डावाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या 25 चेंडूतील 51 धावांच्या खेळीमध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. या दोघांच्या योगदानामुळे भारतीय संघाने 179 धावा काढल्या.

भारतीय संघाने सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिले, ‘आणखी एक मोठा निकाल’ त्याखाली सूर्यकुमारने ‘सूरवीर’ अशी कमेंट केली. त्यानंतर कोहलीने त्याला उत्तर देत ‘हाहाहा मानला भाऊ’ असे लिहीले.

https://www.instagram.com/p/CkNtmLePezB/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

विराट आणि सूर्यकुमार हे मागील दोन वर्षापासून सातत्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची भागीदारी करत विजयात योगदान दिले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---