इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने आले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या विजयात अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याचे मोलाचे योगदान राहिले. त्याने केलेल्या वादळी फलंदाजीमुळे मुंबईने 200 धावांचे आव्हान 17 षटकात पूर्ण केले. या सामन्यातील अनेक पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. मात्र, एक पुरस्कार तो पात्र नसतानाही त्याला देण्यात आला.
सूर्यकुमार यादव याने या सामन्यात फक्त 35 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 83 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 6 उत्तुंग षटकार आणि 7 सणसणीत चौकार खेचले. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना सर्वांगसुंदर फटकेबाजी करताना 200 धावांचे आव्हान अगदी क्षुल्लक भासवले.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याच्या खात्यात अनेक पुरस्कार पडले. सामनावीर पुरस्कारही त्याला देण्यात आला. यासोबतच सामन्या दरम्यान सर्वाधिक स्ट्राइक रेट राखल्याने तो पुरस्कार, सामन्यातील सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार आणि गेम चेंजर पुरस्कार त्याला मिळाले. याव्यतिरिक्त सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा पुरस्कार देखील त्याला दिला गेला. मात्र, सूर्यकुमार या पुरस्कारासाठी पात्र ठरत नव्हता.
सूर्यकुमारने आपल्या खेळीत 7 चौकार लगावले. मात्र, त्यापेक्षा जास्त 8 चौकार ग्लेन मॅक्सवेल याने मारले होते. त्यामुळे हा पुरस्कार सूर्यकुमारला का दिला गेला. असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरस्कार देणारी कमिटी हा पुरस्कार पुन्हा एकदा मॅक्सवेलला देणार की सूर्यकुमारकडे ठेवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या सामन्यात विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर, आरसीबीसमोर डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण झाली असून, त्यांना आता तीनही सामने जिंकावे लागतील.
(Suryakumar Yadav Non Deserving Super Fours Award Given By Committee Against RCB In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली बाहेर होणार की चेन्नई ठरणार वरचढ? आयपीएल 2023 मध्ये बुधवारी निर्णायक झुंज
मैं हू ना! 200 धावा चेस करताना सूर्या तळपतोच, पाहा ही जबरदस्त आकडेवारी