---Advertisement---

चौथ्या क्रमांकावर कोणत्या मुंबईकरांची लागणार वर्णी? प्रश्न अजूनही अनुत्तरित

On: सोमवार, मार्च 22, 2021 11:41 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (२३ मार्च) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. सर्व सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर खेळविण्यात येतील. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघात सलामीवीर कोण असतील, हे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. मात्र, मधल्या फळीत कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

चौथ्या जागेसाठी दोन मुंबईकरांमध्ये लढत
वनडे मालिकेत भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याबाबत अजूनही काही ठरले नाही. या जागेसाठी दोन मुंबईकरांमध्ये सरळ सरळ लढत होणार आहे. गेली दोन वर्ष भारतीय संघाच्या वनडे व टी२० संघाचा नियमित फलंदाज श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.
श्रेयसला या जागेसाठी दुसरा मुंबईकर आणि या मालिकेतून वनडे पदार्पण करण्यास उत्सुक असलेला, सूर्यकुमार यादव लढत देईल. सूर्यकुमारने नुकत्याच संपलेल्या टी२० मालिकेत धमाकेदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, सध्याचा फॉर्म व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव पाहता संघ व्यवस्थापन श्रेयस अय्यर विश्वास दाखवेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दोन अनुभवी फलंदाज देणार भारतासाठी सलामी
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या सलामीवीरांची नावे जाहीर केली. पहिल्या सामन्यात भारतासाठी रोहित शर्मा व शिखर धवन ही अनुभवी जोडीच सलामीला येईल असे विराटने स्पष्ट केले. स्वतः विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित आहे.
भारतीय संघात सध्या सलामीसाठी रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि शुबमन गिल हे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉ व देवदत्त पडीक्कल यांनी चमकदार कामगिरी केल्याने राष्ट्रीय संघातील इतर खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेपूर्वी कोसळली प्रेक्षक गॅलरी 

धक्कादायक! पंचांनी ठोठावलेल्या निर्णयाने खेळाडूंमध्ये मारामारी; ठोसा लागून जमिनीवर पडला गोलंदाज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना व्हायला हवा होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---