BCCI Meeting : भारतीय पुरुष क्रिकेट संघ या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा दाैरा करणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाला 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्याची सुरुवात 27 जुलै पासून होणार आहे. तर या दाैऱ्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा केली. ज्यामध्ये बीसीसीआयकडून अनेक आश्चर्यचकित निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वाधिक आश्चर्यकारक निर्णय हा भारतीय टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे जाण्याचा होता. मात्र, आता याबाबत एक मोठा खुलासा होत आहे.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक या संघात केवळ खेळाडू म्हणून सहभागी होईल. त्याचे उपकर्णधारपदही शुबमन गिल याला देण्यात आले आहे. मात्र, कर्णधारपदाचा दावेदार असताना त्याच्यावर ही वेळ आली. सूर्यकुमार याला कर्णधार बनवण्यात नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची महत्त्वाची भूमिका राहिली. यापूर्वी गंभीर व सूर्यकुमार यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकत्रित कर्णधार व उपकर्णधारपद भूषवले होते.
याव्यतिरिक्त सूर्यकुमार याला कर्णधार बनवण्यात संघातील खेळाडूंचा देखील वाटा असल्याचे समजत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, निवडसमिती व मुख्य प्रशिक्षक यांच्यामध्ये एकमत होत नसल्याने काही खेळाडूंना फोन करून त्यांचे मत विचारले गेले. त्यावेळी अधिक खेळाडूंनी सूर्याच्या बाजूने आपले मत दिले. खेळाडू सूर्यसोबत अधिक सहजतेने संवाद साधू शकतात, या गोष्टीवर एकमत झाल्याने अखेर सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून निवडले गेले.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद. सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!