भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून (19 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच कालावधीनंतर पांढऱ्या जर्सीत मैदानावर परतलेले अधिकतर भारतीय खेळाडू लयीत दिसले नाहीत. बांगलादेशचा युवा गोलंदाज हसन महमूद भारतीय संघाच्या वरच्या फळीसाठी कर्दनकाळ ठरला.
कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. यष्टीरक्षक रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत डाव काही प्रमाणात सांभाळला, पण पंतची विकेट पडल्यानंतर अर्धशतक करणारा यशस्वीही टिकू शकला नाही. एकेकाळी भारतीय संघाची धावसंख्या 6 विकेटवर 144 धावा होती. मात्र दिवसाच्या शेवटी भारताचे शेपूट वळवळले आणि रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजाने दमदार भागीदारी करत संघाला सामन्यात परत आणले.
अश्विन-जडेजाची दमदार फलंदाजी
रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. रवींद्र जडेजानेही पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहताना 86 धावा केल्या. दिवसअखेर भारताची धावसंख्या 339 वर आली. अश्विन आणि जडेजा यांच्या या दमदार भागीदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता भारतीय संघाचा टी0 कर्णधार सूर्यकुमार यादव याने दोघांचे खास अभिनंदन केले आहे. सूर्याने प्रसिद्ध बाजीराव मस्तानीच्या डायलॉगच्या शैलीत जडेजासाठी खास पोस्ट लिहिली, तर अश्विनचे कौतुक करताना सूर्याने माफी मागितल्याने चाहत्यांचा गोंधळ उडाला.
सूर्याने का मागितली अश्विनची माफी?
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये रवींद्र जडेजाचा फोटो शेअर करताना सूर्यकुमार यादवने लिहिले की, ‘बिबट्याची चाल, गरुडाची दृष्टी आणि जड्डू भाईच्या तलवारीवर कधीही शंका घेऊ नये.’
SKY lauds Ashwin & Jadeja for their incredible performances!🙌#SuryakumarYadav pic.twitter.com/DH9WZhFmje
— Surya-Accelerator-Kumar-Yadav (@AbhisekPan9122) September 19, 2024
तर सूर्याने अश्विनचे कौतुक करताना आधी ‘सॉरी भावा’ असे लिहिले, पण त्यानंतर सूर्याने जे लिहिले ते आणखी विचित्र होते. त्याने लिहिले, ‘तू महान खेळाडू आहेस (टाळी वाजवत इमोजी) पण? (हसणारे इमोजी).’ सूर्याच्या अश्विनच्या कौतुक करण्याच्या या पद्धतीने चाहत्यांना मात्र गोंधळात टाकले आहे.
हेही वाचा –
बीसीसीआय उपाध्यक्षांना मातृशोक, राजीव शुक्ला यांच्या आईचे 97व्या वर्षी निधन
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद