बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत रविचंद्रन अश्विननं दमदार कामगिरी करत शतक झळकावलंय. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यानं रवींद्र जडेजासोबत 8व्या विकेटसाठी 195 धावांची भागिदारी केली.
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतानं 144 धावांवर 6 विकेट गमावल्या. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विननं डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी प्रथम आपलं अर्धशतक साजरं केलं. यानंतर दिवसाच्या शेवटच्या सत्रात अश्विननं आपलं शतक पूर्ण केलं. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे सहावं शतक आहे. भारतानं दिवसाअखेर 6 विकेट गमावून 339 धावा केल्या. सध्या अश्विन (102) आणि रवींद्र जडेजा (86) क्रिजवर आहेत.
अश्विननं 108 चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं 10 चौकार आणि 2 षटकार मारले. जडेजा आणि अश्विनच्या भागीदारीनं अनेक विक्रम मोडीत काढले. या दोघांनी बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटच्या खाली भारताची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी 2004 मध्ये झहीर खान आणि सचिन तेंडुलकर यांनी 10व्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली होती. मात्र, आता अश्विन आणि जडेजानं नाबाद 195 धावांची भागीदारी करून हा विक्रम मोडला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाला. शुबमन गिल शून्यावर बाद झाला, तर विराट कोहली केवळ 6 धावा करून तंबूत परतला. रिषभ पंतनं 52 चेंडूत 39 धावा केल्या. तर केएल राहुल 16 धावा करून बाद झाला. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 118 चेंडूंचा सामना करत 56 धावा केल्या. यशस्वीनं आपल्या खेळीत 9 चौकार मारले. बांगलादेशसाठी हसन मेहमूदनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद
शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलच्या नावे नकोसा रेकॉर्ड, विराट कोहलीचाही लिस्टमध्ये समावेश
18 वर्षाच्या खेळाडूची कमाल, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला!