भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. राजीव शुक्ला यांच्या आईने वयाच्या 97 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून गँगरीनने आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. राजीव शुक्ला हे बऱ्याच काळापासून बीसीसीआयशी जोडले गेले आहेत. सध्या ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.
अलीकडेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचा वाढदिवस कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर साजरा करण्यात आला. भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटीच्या तयारीत व्यस्त असलेल्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या संघटनेच्या माजी सचिवाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.
शुक्लाहे भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात. ते राजकारणात असले तरी क्रिकेटशी त्यांचा जवळचा संबंध आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या सचिव पदापासून भारतीय संघाचे व्यवस्थापक, गव्हर्नमेंट कौन्सिल सदस्य, आयपीएल चेअरमन व बीसीसीआय उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या आहेत.
अलीकडेच राजीव शुक्ला यांच्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादाच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. टी20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ परतला तेव्हा मुंबईत त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचाच दाखला देत ठाकरे म्हणाले होते की, कोणत्याही मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून हिरावून घेऊ नये.
त्यानंतर उद्धव ठाकरेंना उत्तर देताना शुक्ला म्हणाले की, “महत्त्वाच्या अंतिम सामन्याचे आयोजन करताना बोर्ड एका शहरापेक्षा दुसऱ्या शहराला प्राधान्य देऊ शकत नाही. 1987 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्यात झाला होता. त्यामुळे फायनल ठराविक शहरातच व्हावी, असे ठरवता येणार नाही. मुंबईत अनेक सेमीफायनल आणि फायनल झाल्या आहेत.” वनडे विश्वचषक 2023 अंतिम सामना मुंबई येथे न घेता अहमदाबाद येथे खेळवला गेल्याने बोर्डावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
हेही वाचा –
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद
शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलच्या नावे नकोसा रेकॉर्ड, विराट कोहलीचाही लिस्टमध्ये समावेश