आयसीसीने बुधवारी (26 एप्रिल) आपली ताची क्रमवारी जाहीर केली. पुरुषांच्या ताज्या टी-20 क्रमवारीनुसार पाकिस्तानचे इफ्तिकार अहमद आणि न्यूझीलंडचा मार्क चॅपमन यांनी सर्वोच्च क्रमवारी गाठली आहे. दुसरीकडे मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये असणारा सूर्यकुमार यादव यावेळीही टी-20 क्रमवारीत अव्वल आहे.
चालू आयपीएल हंगामात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मुंबई इंडियन्ससाठी एक अर्धशतक केले आहे. मात्र त्याआधीच्या काही महिन्यांमध्ये त्याची बॅट पूर्णपणे शांत पाहायला मिळाली. मागच्या वर्षी वादळी फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमारने आयसीसी टी-20 क्रमवारीत सर्वोत्तम फलंदाज म्हणून मान मिळवला होता, जो अजूनही कामय आहे. टी-20 क्रमवारीत सर्वोत्तम फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारकडे सध्या 906 रेटिंग पॉइंट्स आहेत.
नुकतीच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेनंतर टी-20 क्रमवारीत काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. या मालिकेत मार्क चॅपमन (Mark Chapman) याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 290 धावा केल्या. या प्रदर्शनाचा फायदा त्याला क्रमवारीत झाला. चॅपमनने टी-20 क्रमवारीत थेड 48 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या यादीत 35वा क्रमांक पटकावला आहे आणि कारकिर्दीतील त्याची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. यापूर्वी 2018 साली चॅपमन 54व्या क्रमांकावर पोहोचला होता.
तसेच मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानसाठी 36 धावांची खेळी करणारा इफ्तिकार अहमद 38व्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचाच मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) दुसऱ्या, तर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इफ्तिकार याआधीत 43व्या क्रमांकावर होता आणि त्याची क्रमवारीत सुधारणा लक्षणीय आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय