Suryakumar Yadav :- भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव युवा खेळाडूंना गुरुमंत्र देताना दिसला. सूर्यकुमार यादव याने शुक्रवारी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या खेळाडूंची भेट घेतली. एनसीएमध्ये युवा खेळाडूंसाठी शिबिर सुरू आहे. भारताचा 19 वर्षांखालील संघ 21 सप्टेंबरपासून वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाशी भिडणार आहे. या मालिकेपूर्वी सूर्याने तरुणांना भेटून त्यांचे मनोबल वाढवले. सूर्यकुमार यादव याने खेळाडूंना त्यांच्या अद्वितीय कौशल्यांचा चांगल्या प्रकारे वापर करण्यासाठी, एक संघ म्हणून एकत्र राहण्यासाठी आणि प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले.
नुकतीच सूर्यकुमार यादव, याची रोहित शर्माच्या टी20 निवृत्तीनंतर भारताचा टी20 कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने 21 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या भारतीय ज्युनियर संघाच्या मालिकेपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये संवाद साधला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवर पोस्ट केले की, ‘इंडिया बॉईज अंडर19 संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना तयारीचा भाग म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथील शिबिरात पाठवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंडर19 संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडूंना टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत बोलण्याची सुवर्णसंधी मिळाली.’
“Inspiring the next gen! 🇮🇳
Team India’s T20I Captain Suryakumar Yadav shares his valuable experience with the U-19 boys at NCA!
Passing on the torch of knowledge and expertise to the future stars of Indian cricket 🔥 #SuryakumarYadav pic.twitter.com/RUXj2hHcRJ— Berzabb (@Berzabb) September 13, 2024
सूर्यकुमारने युवा संघातील या खेळाडूंना त्यांच्या अद्वितीय कौशल्याला पूर्ण न्याय देण्यास आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यास सांगितले. सूर्यकुमार म्हणाला, ‘तुम्ही नेहमी जसे आहेस तसेच रहा. तुमच्यापैकी प्रत्येकाचे एक विशिष्ट कौशल्य आहे आणि त्याला पूर्ण न्याय द्या. प्रक्रिया आणि दिनचर्यवर अधिक लक्ष द्या. निकाल आपल्यासाठी अनुकूल असेल.’
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडही या संघात आहे. उत्तर प्रदेशचा मोहम्मद अमान वनडे संघाचे नेतृत्व करेल. तर चार दिवसीय सामन्यांमध्ये सोहम पटवर्धन संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलच्या जागी मिळाली संघात एन्ट्री, प्रथम सिंगचे दुलीप ट्रॉफीत शानदार शतक
भारत-पाकिस्तान सामन्यात मोठा राडा! मैदानावरच भिडले दोन्ही संघांचे खेळाडू
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या ‘या’ गोलंदाजापुढे स्टार फलंदाज गार