Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 क्रिकेट, सूर्या-इंग्लंड कनेक्शन! भारतीय फॅन्ससाठी आनंददायी, विरोधी संंघाची झोप उडवणारी आकडेवारी पाहाच

टी20 क्रिकेट, सूर्या-इंग्लंड कनेक्शन! भारतीय फॅन्ससाठी आनंददायी, विरोधी संंघाची झोप उडवणारी आकडेवारी पाहाच

November 8, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav

Photo Courtesy: Twitter/BCCI


टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताच्या दोन खेळाडूंनी हवा केली आहे. त्यातील विराट कोहली हे नाव खूप आधीपासूनच सगळ्यांनाच परिचीत असून एकाने मागील काही महिन्यांपासून टी20 क्रिकेटमध्ये झंझावाती खेळी करत चाहत्यांना चकित केले आहे. या स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी (INDvENG)दोन हात करणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार याची सुरूवात दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडलाच काय सर्व संघांना धडकी भरवणाऱ्या भारताचा दुसरा स्फोटक फलंदाज अर्थातच सूर्यकुमार यादव याची आकडेवारी पाहूया.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने भारतीय टी20 संघात 2021मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 39 सामन्यांच्या 37 डावांमध्ये खेळताना 42.33च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 12 अर्धशतकांच्या सहाय्याने 1270 धावा केल्या आहेत. त्याचे हे शतक इंग्लंडविरुद्धच आले आहे. ही खेळी त्याने याचवर्षीच्या जुलै महिन्यात नॉटिंघममध्ये खेळली होती. मालिकेतील तो तिसरा आणि शेवटचा सामना होता. त्यामध्ये सूर्यकुमारने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 88 चेंंडूत 117 धावा केल्या होत्या.

सूर्या-इंग्लंड कनेक्शन
सूर्यकुमारने आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच पदार्पण केले होते. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. जेव्हा त्याला दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना इंग्लंडविरुद्धच 31 चेंडूत 57 धावा केल्या होत्या.

आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक सामने त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध खेळले आहेत, मात्र सर्वाधिक धावा इंग्लंड विरुद्ध केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 6 सामन्यांतील 5 डावांमध्ये खेळताना 52.00च्या सरासरी आणि 195च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याने 260 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक, एक अर्धशतक, 13 षटकार आणि 29 चौकारांचा समावेश आहे.

चालू स्पर्धेत सूर्यकुमार सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आणि नेदरलॅंड्सचा मॅक्स ओदौड याच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 75च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव वि. इंग्लंड (टी20)
सामने – 6
धावा – 260
सरासरी – 52.00
शतक – 1
अर्धशतक – 1
षटकार – 13

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे ‘बॉस’ लावणार हजेरी, गांगुलीचाही असू शकतो समावेश
VIDEO: नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माच्या मागे अश्विनचे ‘​​असे’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, भज्जीने केले ट्रोल


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे सूर्याबाबत वक्तव्य! म्हणाले, 'मी असतो तर सूर्यकुमार यादवसारख्या सर्व फलंदाजांना संघात...'

Kane-Williamson-And-Rohit-Sharma

'असं' झालं, तर भारत- न्यूझीलंड संघात रंगणार टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आयसीसीचा नियम घ्या जाणून

Virat Kohli

विराटची एडिलेडमधील आकडेवारी इंग्लंडसाठी चिंतेचा विषय, टी-20 सामना खेळताना एकदाही नाही झाला बाद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143