---Advertisement---

VIDEO: नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माच्या मागे अश्विनचे ‘​​असे’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, भज्जीने केले ट्रोल

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 2:03 PM
R Ashwin
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या उपांत्य फेरीत भारत 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी भिडणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, भारताने आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध 6 नोव्हेंबरला खेळला. हा सामना भारताने 71 धावांनी जिंकला आणि ग्रुप 2च्या गुणतालिकेत पहिले स्थान कायम राखले. 

या सामन्यानंतर आर अश्विन (R Ashwin) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो गोलंदाजी करत नसून काही वेगळीच हालचाल करताना दिसत आहे. जेव्हा या सामन्याच्या नाणेफेकीसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्रेग एलविन मैदानावर होते, तेव्हा दोन्ही संघाचे काही खेळाडू वॉर्मअप करत होते. रोहितने नाणेफेक झाल्यानंतर प्लेईंग इलेवन सांगितली. तेव्हा अश्विन आपले जॅकेट ओळखण्यासाठी त्याचा वास घेत होता.

मागे उभे असलेल्या अश्विनवर कॅमेराने फोकसदेखील केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. भारताचा माजी फिरकीपटू आणि अश्विनसोबत खेळलेल्या हरभजन सिंग याने हा व्हिडिओ रिट्वीटदेखील केला असून त्यामध्ये अश्विनला टॅग करत ट्रोल केले आहे.

हरभजनबरोबर भारतासाठी खेळलेल्या अभिनव मुकुंद यानेही हा व्हिडिओ शेयर केला. त्याला कॅप्शन देताना म्हटले, ‘हा व्हिडिओ अनेकदा पाहिला असून हसू थांबतच नाही.’

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात अश्विनने गोलंदाजी करताना 4 षटकात 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. यामुळे तो या सामन्याचा सामनावीरही ठरला.

अश्विन भारतासाठी टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 2012-2022च्या दरम्यान आतापर्यंत 23 सामने खेळताना 32 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा क्रमांक लागतो. त्याने 2009-2021च्या दरम्यान 22 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले…
भारताचे टेंशन वाढले! सेमीफायनलसाठी इंग्लंडच्या ताफ्यात टी20मध्ये 139 षटकार ठोकणाऱ्याची एंट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---