Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताचे टेंशन वाढले! सेमीफायनलसाठी इंग्लंडच्या ताफ्यात टी20मध्ये 139 षटकार ठोकणाऱ्याची एंट्री

भारताचे टेंशन वाढले! सेमीफायनलसाठी इंग्लंडच्या ताफ्यात टी20मध्ये 139 षटकार ठोकणाऱ्याची एंट्री

November 8, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Phil Salt v PAK

Photo Courtesy: Twitter/ Pakistan Cricket


आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये आता सर्व संघांचे साखळी सामने खेळून झाले असून उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ पोहोचले आहेत. यातील भारताचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड विरुद्ध 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार असून या सामन्यात इंग्लंडच्या ताफ्यात स्फोटक खेळाडूची एंट्री होण्याची शक्यता आहे.

भारताविरुद्धच्या सामन्याच डेविड मलान (Dawid Malan) खेळला नाहीतर त्याची जागा कोण घेईल हा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे उत्तम आता मिळाले असून माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी फिल सॉल्ट (Phil Salt) याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. मलान याच्या फिटनेसवरून तर तो भारताविरुद्ध खेळण्याच्या आशा कमी आहेत. यामुळे संघात फिलची वर्णी लागेल.

फिलकडे विकेटकिपींगबरोबरच वरच्या फळीत फलंदाजी करण्याचे कौशल्य असल्याने तो थेट सलामीला दिसल्यास काही नवल वाटणार नाही. या स्पर्धेत इंग्लंडकडून जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली आहे. दोघांनी एक-एक अर्धशतकी खेळीही केली आहे.

फिलची टी20मधील कामगिरी
फिलने इंग्लंडकडून याचवर्षी पदार्पण करताना 11 टी20 आणि 8 वनडे सामने खेळले आहेत. टी20 मध्ये त्याने 23.50च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत.  यादरम्यान त्याने 9 षटकार ठोकताना 2 अर्धशतकेही केली आहेत. त्याने 2016मध्ये कारकिर्दीतील पहिला टी20 सामना खेळला. तेव्हापासून ते 2022 पर्यंत त्याने 165 सामन्यात 130 षटकार खेचले. त्यामुळे त्याने 25.55च्या सरासरीने खेळताना 3807 धावा केल्या आहेत. यामध्ये 26 अर्धशतकांचा समावेशदेखील आहे. तसेच त्याने इंग्लंडकडून वनडेमध्ये एक शतकही केले आहे.

टी20 विश्वचषकात मलान ठरला फेल
इंग्लंडने या स्पर्धेत सुपर-12चे 5 सामने खेळले आहेत. यातील तीन सामने जिंकले, एक सामना पावसामुळे रद्द झाला तर एक सामना (आयर्लंडविरुद्ध 5 धावांनी) गमावला. यामध्ये मलानने अफगाणिस्तानविरुद्ध 18, आयर्लंडविरुद्ध 35 आणि न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 3 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याने फलंदाजी केली नाही. याच सामन्यात त्याला फिल्डींग करताना दुखापत झाली होती. यामुळे तो फलंदाजीला आला नाही.

फिलबरोबरच क्रिस जॉर्डन आणि डेविड विले हे पण शर्यतीत आहेत. जॉर्डन हा वेगवान गोलंदाज असून तो डेथ-ओव्हर स्पेशालिस्ट आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 305 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघ डाव्या हाताच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. त्यामुळे विले हा पण संघात खेळण्याची शक्यता आहे. तसेच तो फलंदाज करताना मोठमोठे शॉट्सही मारतो. त्याने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 241 विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये इंग्लंड-भारत यांच्यात ‘कांटे की टक्कर’! टी20मध्ये इंडियाच भारी, आकडेवारी एकदा पाहाच
सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?


Next Post
rishabh pant Urvashi Rautela

उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले...

R Ashwin

VIDEO: नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माच्या मागे अश्विनचे '​​असे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, भज्जीने केले ट्रोल

Roger-Binny-And-Sourav-Ganguly

टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे 'बॉस' लावणार हजेरी, गांगुलीचाही असू शकतो समावेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143