---Advertisement---

सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 11:52 AM
ROHIT BABAR kane jos
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2022 अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी (9 नोव्हेंबर) स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) खेळला जाईल. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. या चारही संघाचे प्रदर्शन ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये चांगले राहिले आहे. मात्र, चारही संघांचे कर्णधार मात्र अपेक्षित खेळी करू शकले नाहीत. चला तर या चारही कर्णधारांच्या प्रदर्शनावर एक नजर टाकूया. 

भारत आणि पाकिस्तान यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात ग्रुप दोनचा भाग होते. भारतीय संघ या ग्रुपमध्ये पाच पैकी चार सामने जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. तर पाकिस्तानने पाच पैकी तीन सामने जिंकत दुसरा क्रमांक गाठला. ग्रुप एकचा विचार केला, तर न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांकडे गुण देखील प्रत्येक सात-सात आहेत. पण नेट रन रेटच्या आधारे न्यूझीलंड या गुणतालिकेत पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे चार संघ आता उपांत्य सामन्यात खेळणार आहेत. पण चाहत्यांचे लक्षा खासकरून या चारही कर्णधारांवर राहणार आहे. कारण त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत अपेक्षित खेळ दाखवला नाहीये.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियन्सन (Kane Williamson) त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण विलियन्सन मागच्या मोठ्या काळापासून त्याच्या प्रतिभेप्रमाणे फलंदाजी करताना मात्र दिसला नाही. टी-20 विश्वचषक 2022 मध्येही त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. त्याने या विश्वचषकात केळलेल्या चार डावांमध्ये एकूण 132 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 33 धावांची होती, तर स्ट्राईक रेट 118.92 होता. 61 धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी ठरली.  टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी जोस बटलर (Jos Buttler) याने सांभाळली. त्याने या स्पर्धेतील चार डावांमध्ये एकूण 119 धावा केल्या. यादरम्यान बटलरची सरासरी 29.75 होती, तर स्ट्राईक रेट 132.22 राहिला आहे. 73 धावा ही त्याने यावर्षीच्या विश्वचषकात केलेली सर्वात मोठी खेळी ठरली.

त्यानंतर नाव येते ते म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे. रोहितने 5 डावांमध्ये अवघ्या 17 ची सरासरी आणि 109.88 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या आहेत. त्याने नेदरलँड्सविरुद्ध 53 धावा केल्या होत्या, जी त्याची या स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी ठरली. बाबर आझम (Babar Azam) या यादीत सर्वात खाली म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे. बाबरची बॅट यावर्षी खूपच शांत दिसली आहे. चालू टी-20 विश्वचषकात त्याने आतापर्यंत खेळलेल्या पाच डावांमध्ये 7.80 च्या सरासरीने आणि 61.90 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 39 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वात मोठी खेळी देखील अवघ्या 25 धावांची आहे.

दरम्यान, टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. तर भारत आणि इंग्लंड संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी एडिलेड ओव्हल याठिकाणी आमने सामने येतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिवनारायन चंद्रपॉलसह ‘या’ दोन महान खेळाडूंचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाकिस्तानचा खेळाडूही सामील
मुश्ताक अली ट्रॉफीपाठोपाठ विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचा मुंबईचा मनसुबा! 17 सदस्यीय संघ जाहीर  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---